आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Pix: मृण्मयीच्या वेडिंग रिसेप्शनला सेलेब्सची मांदियाळी, नाना पाटेकर-सचिन यांची हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षी अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले. मयुरी देशमुख, संग्राम समेळ, चिराग पाटील, श्रुती मराठे यांच्यासह अग्निहोत्र, कुंकू या मालिकांमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचेही शुभमंगल झाले. 3 डिसेंबर रोजी व्यावसायिक स्वप्नील रावसोबत मृण्मयी लग्नाच्या बेडीत अडकली. अगदी पेशवाई थाटात दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसाठी खास वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.

नाना पाटेकर, सचिन पिळगावकर, गायक शंकर महादेवन आणि त्यांच्या पत्नी, भार्गवी चिरमुले, विशाखा सुभेदार, भूषण प्रधान, संगीतकार राहुल रानडे, अमृता खानविलकर, दिप्ती श्रीकांत, पूजा सावंत, अनिकेत विश्वासराव, पॅडी कांबळे, पुष्कर श्रोत्री यांच्यासह अनेक सेब्रिटींनी रिसेप्शनला हजेरी लावून नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. 'बिग फॅट वेडिंग' असलेल्या या विवाहसोहळ्यात संगीत आणि मेंदी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. मृण्मयीने तिच्या लग्नसोहळ्याचे फोटोज फेसबुकवर शेअर केले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, मृण्मयी-स्वप्नीलच्या वेडिंग रिसेप्शनचे खास फोटोज...

(छाया सौजन्यः मृण्मयी देशपांडे फेसबुक)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...