आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा हिरोंची एक हिरोईन आहे,सोनाली कुलकर्णी..वाचा कशी बनली ‘पोश्टर गर्ल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाली कुलकर्णी बनली 'पोश्टर गर्ल'

‘पोश्टर बॉईज’ ह्या सिनेमानंतर आता दिग्दर्शक समीर पाटील ‘पोश्टर गर्ल’ हा सिनेमा घेऊन येणार आहेत. समीर पाटील ह्यांच्या ‘पोश्टर बॉईज’मध्ये तीन हिरो होते. तर आता त्यांच्या ‘पोश्टर गर्ल’मध्ये फक्त एकच हिरोइन असणार आहे. आणि ती असेल, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. नुकताच ह्या चित्रपटाचा मुंबईत मुहर्त करण्यात आला.

‘पोश्टर बॉईज’चा निर्माता श्रेयस तळपदे होता. तर आता ‘व्हायकॉम 18’ आणि 'चलो फिल्म बनाये' मिळून ‘पोश्टर गर्ल’ची निर्मिती करणार आहे. पोश्टर बॉईजनंतर ‘पोश्टर गर्ल’ असे नाव असलेला चित्रपट समीर बनवतायत, म्हटल्यावर उत्सुकता चाळवली नाही, तरच नवल. समीरला ह्याबद्दल विचारल्यावर ते म्हणतात, “हा चित्रपट ‘पोश्टर बॉईज’चा सिक्वेल नाही. तो पूर्णपणे वेगळा चित्रपट होता. ह्याचे कथानक पूर्ण वेगळे आहे. चित्रपटाचे नाव मी ठरवले नाही. तर ते निर्माती कंपनी ‘व्हायकॉम 18’ने ह्या चित्रपटाला दिलेले नाव आहे. त्यांचा या मागचा काय विचार आहे, ते मला माहित नाही.”

चित्रपटाविषयी समीर पूढे सांगतात, “ हा एक विनोदी आणि मनोरंजन करणारा चित्रपट आहे. हेमंत ढोमेची कथा-संवाद आहे. आणि पटकथा मी आणि हेमंतने मिळून लिहीली आहे. स्त्रीयांविषयीचा आदर करावा हा मेसेज देणारा हा सिनेमा आहे. पण ते विनोदी ढंगाने असेल.”

‘पोश्टर गर्ल’मध्ये जरी एकच अभिनेत्री असली तरीही तिला हिरो भरपूर आहेत. जीतेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, हृषिकेश जोशी, असे तिला किमान ६-७ हिरो असणार आहेत. चित्रपटाचे शुटिंग २० ऑगस्टपासून सुरू होऊन महिनाभर चालेल. पूणे आणि भोरमध्ये चित्रीकरण होणार आहे. चित्रपट डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, पोश्टर गर्ल सोनाली कुलकर्णी सांगतेय, तिच्या भूमिकेबद्दल