मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी महालक्ष्मी मंदिरात
मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी स्टारर ‘डबल सीट’ ही फिल्म १४ ऑगस्टला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. ह्या चित्रपटाचे महाराष्ट्रभर आता प्रमोशन करण्यासाठी अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वेसह फिल्मची संपूर्ण टीम फिरेल. प्रमोशनच्या सुरूवातीला अंकुश-मुक्ताने कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंगळवारी दर्शन घेतलं.
सकाळी सकाळी ‘डबल सीट’च्या संपूर्ण टीमचे महालक्ष्मीच्या मंदिरात छान दर्शन झाल्यावर मुक्ता-अंकुशने
आपल्या सहकलाकरांसोबत मंदिराच्या आवारात सेल्फीही काढून ते लगेच सोशल नेटवर्किंग साइटवरून शेअरही केले. मंगळवारी, कोल्हापूर, बुधवारी पूणे असं करत आता त्यांचा येते पंधरा दिवस महाराष्ट्रभर दौरा असणार आहे.
आपल्या चित्रपटाबद्दल सांगताना मुक्ता बर्वे म्हणते,“स्वप्न पाहणा-या माणसांचा हा चित्रपट आहे. प्रत्येक माणूस कुठल्याही क्षेत्रात असला, मग तो गावात राहणारा असो की शहरातला काहीतरी आयुष्यात करू पाहत असतो. त्यामूळे हा चित्रपट पाहताना प्रत्येकजण ह्यातल्या अमित-मंजिरी ह्या जोडप्याशी आपलं साधर्म्य शोधू शकतो. एक उडी तर मारून पाहू, ही मानसिकता ह्या दोघांची आहे. ह्या गोष्टीत एक जादू आहे. त्याने मोहून गेले. आणि मला असं वाटतं, या मंजिरी-अमितच्या कथेची मोहिनी आता प्रेक्षकांवरही चढेल.”
आपल्या भूमिकेविषयी ती सांगते,“गावातून शहरात लग्न करून आलेल्या मंजिरीचं आपल्या पतीवर अमितवर नितांत प्रेम आहे. आणि तिला आता त्याच्यासोबतच आपल्या आयुष्यतलं प्रत्येक स्वप्न पाहण्याची इच्छा आहे. छोटीशी स्वप्न आहेत. तिची पण अर्थपूर्ण आहेत.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, अंकुशने कसं केलं मुक्ताचं स्वप्न पूर्ण