आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मुक्ताला काढायचीय शाहरूख-सलमानची LIC POLICY, अंकुशसोबत बसणार ‘डबल सीट’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी स्टारर डबल सीट चित्रपटाचा प्रोमो बघण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा..)
मुंबई ही तर स्वप्नांची नगरी. या मायानगरी मुंबईत रोज हजारो जण स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपड करतात. अशीच एका जोडप्याची धडपड एस्सेल व्हिजनच्या आगामी ‘डबलसीट’ या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहे. मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा लिहिली आहे, लेखक क्षितीज पटवर्धन यांनी. तर ती दिग्दर्शित केली आहे, समीर विध्वंस यांनी.
चित्रपटाच्या कथेविषयी सांगताना लेखक क्षितीज पटवर्धन सांगतात, “ कोकणात रोह्यामध्ये राहणारी एक मुलगी जी LIC एजंट असते. आणि ती मुंबईविषयीची नेहमी स्वप्न पाहत असते. मुंबईतलाच मुलगा मिळावा,अशी तिची लग्न करताना एकुलती एक अपेक्षा असते. तिला मुंबईत राहणा-या सेलिब्रिटींच्या एलआयसी पॉलिस काढण्याचं स्वप्न नेहमी पाहत असते. आणि त्यामुळेच मग ती मुंबईत राहणारा, कुरीयर कंपनीत डिस्पॅच मॅनेजर असलेल्या मुलाशी लग्न करते. आणि मुंबईत येते. ह्या मुख्य भूमिकांमध्ये मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी आपल्याला दिसणार आहेत.”
चित्रपटाचा फस्ट लूक टिझर नुकताच रिव्हील झालाय. ज्यामध्ये अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे मुंबई दर्शन करताना दिसत आहेत. शाहरूख खान आणि सलमान खानचं मुंबईतलं घर पाहणारी, मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर अंकुशसोबत बसलेली नुकतीच गावातून आलेली मुक्ता आपल्याला दिसत आहे. श्याम बेनेगल आणि सई परांजपेंच्या पठडीच्या चित्रपटांनी आपल्याला नेहमीच मध्यमवर्गीय माणसांची छोटी-मोठी स्वप्न दाखवली आहेत. आणि हा टिझर पाहिल्यावर त्याच धाटणीचा हा चित्रपट असणार असं वाटतं.
त्याविषयी सांगताना लेखक क्षितीज पटवर्धन सांगतो, “ मुंबईत राहणारं हे जोडपं, मुंबईत राहताना आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या नवरा-बायकोचं नातं कसं फुलतं जातं, त्याची वीण कशी घट्ट होतं राहते. आणि ते कसे एकमेकांच्या साथीने आयुष्य जगणं शिकू लागतात, हे सगळं तुम्हांला या चित्रपटातून दिसेल..”
पूढील स्लाइडमध्ये वाचा, मुक्ता बर्वेचं काय आहे, छोटंस स्वप्न...