आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘का रे दूरावा’मध्ये मुक्ता बर्वेची झाली एन्ट्री, मालिकेमध्ये येणार का नवा ट्विस्ट?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'का रे दुरावा'च्या सेटवर मुक्ता बर्वे
‘का रे दुरावा’ मालिकेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. आणि आता मालिकेत मुक्ता बर्वेची एन्ट्री होते आहे. आता मुक्ता बर्वे येतेय, म्हटल्यावर तिच्यामूळे मालिकेत ट्विस्ट येणार का? मालिकेत नुकतीच आदितीच्या वडिलांची सर्जरी झालीय. आता मुक्तामूळे मालिकेत काय होणार? बरं, मुक्ताची एन्ट्री मालिकेत होताना ती ‘देव टूर्स एन्ड ट्रॅव्हल्स’च्या ऑफिसमध्ये शिरलीय, म्हटल्यावर आता ती ह्या कंपनीतली नवी कर्मचारी असणार? की अजून कोणी? असे अनेक प्रश्न घेऊनच आम्ही मुक्ताकडे गेलो.
मुक्ता बर्वे ह्यावर म्हणाली, “नुकतंच मालिकेत बरंच टेन्शन येऊन गेलंय. त्यामूळे आता मालिकेत नवं काही टेन्शन आणण्याची निर्मात्यांची बिलकुल इच्छा नाही. निदान माझ्या एन्ट्रीने तरी नाहीच नाही. मालिकेत मी येतेय, ती मंजिरी बनून. माझी नुकतीच ‘डबलसीट’ ही फिल्म रिलीज झालीय. आणि मी माझ्या फिल्मच्या प्रमोशनसाठी माझ्या चित्रपटाच्याच भूमिकेत मी येत आहे. चित्रपटात मी मंजिरीच्या भूमिकेत आहे. जी लोकांची जीवन विमा पॉलिसी काढतेय. ती पॉलिसी काढण्यासाठी म्हणून ह्या ट्रॅव्हल कंपनीत पाऊल ठेवते. पण ट्रॅव्हल कंपनीतले कर्मचारी मात्र ती टूरची चौकशी करायला आलेली आहे, असे समजतात. मंजिरी सगळं एकून घेते. आणि मग ती पॉलिसी काढायला आल्याचे सांगते. आणि त्यांच्या हनिमून पॅकेज टूरचाही विचार करण्याचे आश्वासन देते. मंजिरीचा खेळकर स्वभाव सर्वांना आवडतो.फक्त एका भागापूर्तीच माझी ही एन्ट्री असणार आहे.”
आता सध्या ‘मंजिरी’ बनून मुक्ता वेगवेगळ्या मालिकांच्या सेटवर प्रमोशनसाठी जात असली. तरीही आता चित्रपटात व्यस्त असलेली मुक्ता पूर्णवेळ मालिका करत नाही. आणि ‘का रे दुरावा’च्यासेटवर आल्यावर तिथल्या वातावरणाने मुक्ता थोडी नॉस्टेलजिक झाली. ती म्हणाली, “ का रे दुरावा’चा सेट जिथे लागलाय, तिथेच आमचा ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’चा सेट लागला होता. त्यामूळे इथे पाऊल ठेवल्या ठेवल्या त्या मालिकेची आठवण झाली. माझं, सुकन्याताई आणि विनयसरांचं घर इथे होतं. त्या गोष्टीची आठवण झाली. मी माझ्याच घरात पाऊल ठेवतेय, असं क्षणभर वाटलं. माझा वाढदिवस इथेच सेलिब्रेट झाला होता.”
मुक्ता म्हणते,”मी टीव्ही मालिकेत काम करणं आता मिस करते. मला उगाच करायचं म्हणून काम करायला आवडतं नाही. म्हणून भारंभार कामं मी घेत नाही. माझी ‘छापाकाटा’ आणि ‘लव्हबर्ड्स’ ही दोन्ही नाटकं सध्या सुरू असल्याने मालिकांसाठी सध्या माझ्याकडे वेळ नाही. पण आठवड्यातनं दोन ते तीन दिवस मी मालिकेसाठी वेळ देऊ शकते. आता तसा रोल आला तर, पून्हा मालिकेत काम करेन.”
पुढील स्लाइडमध्ये, पाहा, मुक्ता बर्वे आल्यावर मालिकेच्या सेटवर सुरू झाले सेल्फी सेशन..