आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukta Barve, Kishore Kadam And Smita Tambe Will Work Together Again

मुक्ता, किशोर, स्मिता हे त्रिकूट पुन्हा येणार एकत्र, रंगणार अभिनयाची मैफल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही सिनेमे सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरतात. त्यातील काही पात्रे अविस्मरणात राहतात. हे पात्र साकारणारे कलाकारसुध्दा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. परंतु या पात्रांना भविष्यात पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळतेच असे नाही. पण त्यातील काहींना पुन्हा एकत्र येण्याची संधी चालून येते. अशीच संधी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या सिनेमातील पात्र साकारणा-या मुक्ता बर्वे, किशोर कदम आणि स्मिता तांबे यांना मिळाली आहे. विजयते एनटरटेन्मेंट बॅनरखाली तयार होणा-या 'गणवेश' या आमागी मराठी सिनेमात 'जोगवा'मधील हे त्रिकूट पुन्हा एकत्र येणार आहेत.
सुप्रसिध्द कॅमेरामन अतुल जगदाळे दिग्दर्शनाकडे वळले असून तेच हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. स्मिता तांबे, मुक्ता बर्वे, किशोर कदम हे त्यांचे कलाकार असणार आहेत. तिघांच्या भूमिका वेगळ्याच थाटणीच्या असतात, त्या मनात घर करू बसतात. त्यामुळे या सिनेमातील भूमिकासुध्दा काहीशा अशाच असतील असा अंदाजा लावला जाऊ शकतो.
या सिनेमाची कथा एका वीट भट्टी कामगार जोडप्याची आणि त्यांच्या एका मुलाची आहे. 15 ऑगस्टवर आधारित भाषणात त्यांच्या मुलाची निवड होते, मात्र त्यासाठी शाळेचा 'गणवेश' आवश्यक असतो. या 'गणवेशा' मागे नेमकी कोणती कथा दडलीये, हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
सिनेमाच्या दिग्दर्शनासोबत कॅमेराही अतुल जगदाळेच हाताळत आहेत. पटकथा तेजस घाडगे यांनी लिहिली आहे. राजेंद्र कुलकर्णी आणि शेलेंद्र घाडगेया सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमाला निहार शेंबेकर यांनी संगीत दिले आहे. नंदेश उमप आणि उर्मिला धनगर यांनी आवाज दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सिनेमाच्या शूटिंगची काही छायाचित्रे...