आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ता बर्वेचा Fear Factor, तिला वाटली कसली भिती? जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ता बर्वे
अभिनेत्री मुक्ता बर्वे गेल्या १५ वर्षांमध्ये मुंबईकर झालीय. आज तिचं मुंबईत घरही आहे. मुंबईचं फास्ट लाइफ आता तिच्या अंगवळणी पडलंय. पण जेव्हा ती १५ वर्षांपूर्वी मुंबईत आली. तेव्हा मुंबईला प्रचंड घाबरलेली होती.
मुक्ता त्याबद्दल सांगते, “ मी मुळची पुण्यातली. त्यामुळे कुठेही जायचे असेल, तर स्कुटी काढायची आणि फिरायचे, हा बाकी पुणेकरांसारखाच माझाही रिवाज होता. पण मुंबईत आले, आणि इथे सगळीकडे फिरायला लोकल ट्रेनने प्रवास करावा लागतो, ही बाब लक्षात आली. आले, तेव्हा कुर्ल्याच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होते. आता आपल्यालाही गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये चढावं, उतरावं लागणार याची मनात इतकी भीती बसली होती, की आठवडा-दोन आठवडे मी रोज दादर स्टेशनला जायचे. गर्दीच्या वेळी लोकं ट्रेनमध्ये कशी चढतात. ते पाहायचे. दादरच्या ब्रीजवर उभी राहून खालची गर्दी पाहताना मनावर प्रचंड दडपण यायचे. ३० सेकंद थांबणा-या ट्रेनमधनं १० सेकंदात उतरणारी आणि २० सेकंदात चपळाईने चढणारी लोकं आ वासून आणि चक्रावून पाहायचे.”
आजही ती मुंबईत तितकीशी रूळली नाही. मुक्ता पूढे सांगते,” आजही मला पूर्व आणि पश्चिम यात गोंधळ होतो. आजही मला विरारला जाणारी ट्रेन कोणत्या दिशेला येते. आणि चर्चगेटला जाणारी गाडी कोणत्या दिशेने जाते. काहीही समजत नाही. लोकल ट्रेनवरची इंडिकेटर आजही वाचता येत नाहीत.”
मुक्ताने जेव्हा मुंबईत पाऊल ठेवलं, तेव्हा मुंबईचे अनेक अलिखीत नियम तिला हळू हळू कळू लागले. मुंबईतल्या जगण्याशी जुळवून घेताना मुक्ताला अनेक प्रश्न पडायचे. मुक्ता म्हणते, “मी कुर्ल्याला राहायचे. तिथे रिक्षा, टॅक्सी दोन्ही उपलब्ध होत्या. पण कुर्ल्यापासून उपनगरात जाण्यासाठी रिक्षा आणि दादर किंवा मुंबईकडे जाण्यासाठी टॅक्सी का? किंवा वांद्रयापासून उपनगराकडे जाण्यासाठी रिक्षा आणि वांद्र्यापासून मुंबईकडे जाण्यासाठी टॅक्सी असे विभाजन का? हे काही उमजयाचे नाही.”
आता माझी हीच दूविधा १५ वर्षांनी मी माझ्या ‘डबलसीट’ चित्रपटात मांडतेय.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जून २०१५ला केलेला रेल्वे प्रवास