आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 'बसस्टॉप'वर 21 जुलैला थांबायला हवं!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'ऑनलाईन–बिनलाईन' आणि 'बघतोस काय मुजरा कर' या सिनेमाच्या यशानंतर तरुण चित्रपट निर्माता आणि मराठी गायक रॅपर श्रेयश जाधव ‘बसस्टॉप’ हा सिनेमा घेऊन येत आहे. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे प्रमुख भूमिकेत आहेत.
 
नुकताच या मल्टिस्टारर सिनेमाचा फस्ट लूक रिव्हील करण्यात आला. या पोस्टरवर अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे या यंगस्टर्सचा कूल लूक बघायला मिळतोय. 
 
गणराज असोशिएट्स प्रस्तुत या सिनेमाचे दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केलं असून पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या निर्मात्यांची देखील यात महत्वाची भूमिका आहे. गतवर्षाचे राज्य पुरस्कार विजेते अभिजित अब्दे यांच्या कॅमे-यातून या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. शिवाय संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी संगीत दिले आहे. ‘बसस्टॉप’ हा सिनेमा येत्या 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..
बातम्या आणखी आहेत...