आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Directors Ajay Atul Sharing Experience Of Recording Sairat Music In Hollywood

VIDEO: अजय-अतूलने दिव्यमराठीसाठी गायलं गाणं, ‘हॉलीवूडला शिकवलं याडं लागलं’ म्हणायला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीतकार अजय-अतूलनी लॉस एन्जेलिसच्या सोनी स्कोरिंग स्टुडियोमध्ये सैराट सिनेमाच्या संगीताचं रेकॉर्डिंग करून मराठीचा झेंडा हॉलीवूडमध्ये अभिमानाने लावलाय. आता त्यांना मराठी संगीताला जागतिक संगीतामध्ये मानाच्या स्थानावर पोहोचवायचंय.
Divyamarathi.comला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “जागतिक संगीतातला एक मानाचा कोपरा मराठी संगीताचा असावा, ह्यासाठी जे काही करता येईल, ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि आता तर अशा सिम्फनी ऑर्केस्ट्राची आम्हांला चटकच लागलीय. त्यामूळे आता जेव्हा पून्हा अशा पध्दतीने एखादे गाणे ऑर्केस्ट्रासह निर्माण करावेसे वाटेल, तेव्हा पून्हा आम्ही हॉलीवूडला जाऊन रेकॉर्ड करू.”
हॉलीवूडला जाऊन मराठी गाणं रेकॉर्ड करण्याचा अनुभव अदभुत होता. हे सांगताना ते म्हणतात, “गाणं रेकॉर्ड करायच्या अगोदर त्यासंदर्भातली नोटेशन्स लिहावी लागतात. तेव्हा इंग्रजीमध्ये तिथल्या म्युझिशिअन्सनी लिहीलेलं याडं लागलं आणि सैराट असे शब्द वाचताना आम्हांला खूप गंमत वाटत होती. सोबत हॉलीवूडकर सैराट, झिंगाट, याडं लागलं म्हणताना ऐकणं हा सूध्दा एक मजेशीर अनुभव होता.”
अजय-अतूलनी सैराटला संगीत देण्यासोबतच त्याची गीतंही लिहीलीयत. संपूर्ण सिनेमासाठी गीत आणि संगीत दोन्ही करण्याची जबाबदारी पेलण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव त्यासंदर्भात ते म्हणतात, “आम्हांला नेहमीच गाणं लिहायला स्फुरत होतं. पण आम्ही आमची ती इच्छा दाबून ठेवली होती. कारण दोन-दोन गोष्टी करणं शक्य नाही, हे आम्हांला माहित होतं. ह्याही सिनेमाची गीतं आम्ही लिहीणार नव्हतो. पण जेव्हा फिल्ममेकर कोणाही गीतकाराला आमच्या संगीतावर गीतं लिहायला द्यायला तयारच होतं नव्हते. त्यांना आमच्या संगीताची धूनच एवढी आवडली होती की, बिना शब्दांचंच ते गाणं असावं असं त्याना वाटतं होतं. आणि गीताशिवाय संगीत कितीही मधूर वाटतं असलं तरीही ते आम्हांला नको होतं. म्हणून आम्ही ही गीतं लिहीली. आणि चक्क आमची गाणी सिनेमाच्या संपूर्ण टीमला एवढी आवडली की ती मग तशीच ठेवली. पण आम्हांला गीतं लिहीण्याची चटक लावू नका. कारण अशी गाणी लिहीणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं असतं. गीत-संगीत दोन्ही करायचं तारेवरची कसरत असते.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अजय-अतुलने म्हटलं divyamarathi.com साठी याडं लागलं गाणं