आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Launch Of Upcoming Marathi Film \'AGA BAI ARECHYAA 2\'

PHOTOS: \'अगं बाई अरेच्चा 2\'चे जोशात म्युझिक लाँच, श्रीदेवीच्या हजेरीने इव्हेंटला चारचाँद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केदार शिंदे यांच्या आगामी 'अगं बाई अरेच्चा 2' या सिनेमाचे अलीकडेच म्युझिक लाँच करण्यात आले. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या हस्ते म्युझिक सिडीचे प्रकाशन झाले. "माझे महाराष्ट्रासोबत फार घट्ट ऋणानुबंध आहे. या सिनेमाची कथा अत्यंत साधी-सोपी आणि संवेदनशील आहे. निषादचे विशेष अभिनंदन करेन, की त्याला एवढ्या लहान वयात एवढा मोठा ब्रेक मिळाला. त्याचे कामही उत्तम झाले आहे. या सिनेमाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळे पुन्हा येथेच भेटू अशा शुभेच्छा देते", अशा भावना श्रीदेवीने यावेळी व्यक्त केल्या.
'इंग्लिश विंग्लिश'मधील साधी-सरळ शशी जशी सगळ्यांना भावली, त्याच धाटणीची शुभांगी असल्याने 'अगं बाई अरेच्चा 2'च्या म्युझिक लाँचसाठी श्रीदेवीला निंत्रित करण्यात आल्याचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले. या सोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता अंकुश चौधरी, दिलीप प्रभावळकर, वैशाली सामंत, भरत जाधव यांच्यासह अनेक कलाकार या सोहळ्यात दिसले. या सिनेमाचे संगीत नव्या दमाचा संगीतकार निषाद याचे असून एकुण 5 गाणी सिनेमात आहेत. ओमकार मंगेश दत्त, अश्विनी शेंडे, मनोहर गोलाम्बरे यांनी सिनेमातील गाणी लिहिली आहेत. तर वैशाली सामंत, शंकर महादेवन, आदर्श शिंदे, मनोहर गोलाम्बरे यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत.
'अगं बाई अरेच्चा 2' यायला तब्बल 11 वर्षे लागले, याचे कारण मला पहिल्या सिनेमाचे कथानक जिथे संपले त्याला धरुनच दुसरे कथानक तयार करणे योग्य वाटले नाही. त्याची मजा तेवढीच होती. पंरतू खरी गंमत ही शीर्षकात आहे. 'अगं बाई... अरेच्चा' ही सर्वसामान्यपणे व्यक्त होणारी प्रतिक्रिया आहे. जी कथा ऐकून 'अगं बाई... अरेच्चा' असे उद्गार बाहेर पडतील अशीच कथा आम्ही निवडली, असे केदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.
इरॉस इंटरनॅशनल प्रस्तुत आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे नरेंद्र फिरोदिया, सुनील लुल्ला हे निर्माते तर बेला शिंदे या सहनिर्मात्या आहेत. सिनेमाची कथा ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर आणि केदार शिंदे यांची आहे. सिनेमाचा पुर्वार्ध दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवरुन घेण्यात आला असून उत्तरार्ध केदार शिंदे यांनी रंगविला आहे. सोनाली कुलकर्णी, धरम गोहिल, मिलिंद फाटक, माधव देवचक्के, सुरभी हांडे, नम्या सक्सेना, उमा सरदेशमुख, विद्या पटवर्धन, वरुण उपाध्ये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. त्याचप्रमाणे भरत जाधव, प्रसाद ओक आणि सिद्धार्थ जाधव यांच्या विशेष भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या 22 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्याची खास क्षणचित्रे...