आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Launch Of Marathi Film Balkadu In The Presence Of Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाले \'बाळकडू\'चे म्युझिक लाँच, रितेशसह अनेक सेलेब्सची हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीवर आधारीत 'बाळकडू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा म्युझिक लाँचसोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित थाटात पार पडला. हा सिनेमा खासदार संजय राऊत प्रस्तुत असून दिग्दर्शन अतुल काळे यांनी केलंय.
या म्युझिक लाँच सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. संजय राऊत, रितेश देशमुख, शिल्पा तुळसकर, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, प्रसाद ओक, गायक हरिहरन, स्वप्नील जोशी, नेहा पेंडसे, प्रसाद ओक आणि त्याची पत्नी, उमेश कामत, प्रिया बापट, जयवंत वाडकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या म्युझिक लाँचला हजेरी लावली होती.
महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हटले की पहिले नाव नजरेसमोर येते ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांचे. हाच आवाज 'बाळकडू' या सिनेमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा घुमणार आहे. अभिनेता उमेश कामत हा एका मराठी मध्यमवर्गीय मुलाच्या मुख्य भूमिकेतून या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय. सोबतच, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, जयवंत वाडकर, हृदयनाथ राणे आणि रमेश वाणी हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 23 जानेवारीला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बाळकडू' या सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यातील खास क्षणचित्रे...