आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चीटर\'च्या ट्रेलर लाँचला ग्लॅमरस लूकमध्ये दिसले पूजा-वैभव, पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा सावंत, वैभव तत्त्ववादी - Divya Marathi
पूजा सावंत, वैभव तत्त्ववादी
मुंबईः 'कॉफी आणि बरंच काही', 'बाजीराव मस्तानी' यांसारख्या दर्जेदार कलाकृतींमधुन रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता वैभव तत्त्ववादी आता चक्क ''चीटर'' बनून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते अजय फणसेकर "चीटर" या सिनेमाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा विषय घेऊन येणार आहेत. अलीकडेच मुंबईत या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी सिनेमातील लीड जोडी अर्थातच वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्या ग्लॅमरस लूकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्याला सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
स्वीस एन्टरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या 'चीटर' सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे असून बी. लक्ष्मण ह्यांनी या सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पहिले आहे. अभिनेते हृषीकेश जोशी, वैभव तत्ववादी, अभिनेत्री आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत अशी या सिनेमाची तगडी स्टारकास्ट असून झाकरी नृत्य कलाप्रकार ही आपल्याला पहायला मिळणार आहे.
अखिल जोशी यांनी या सिनेमातील चारही गाणी लिहिली असून अभिजित नार्वेकर यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. या सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच एकाच मराठी सिनेमासाठी दोन गाणी गायली आहेत.गायक अवधूत गुप्ते, गायिका उर्मिला धनगर, आनंदी जोशी यांच्या आवाजातही सिनेमातील अन्य गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ट्रेलर लाँच सोहळ्यात क्लिक झालेली स्टार्सची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...