आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: क्रांतीच्या \'काकण\'चे थाटात म्युझिक लाँच, सपत्नीक पोहोचले भरत जाधव, महेश कोठारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(क्रांती रेडकर दिग्दर्शिक 'काकण' या सिनेमाच्या म्युझिक लाँचला पोहोचलेले भरत जाधव, फुलवा खामकर, महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर, जितेंद्र जोशी, क्षिती आणि हेमंत ढोमे)
मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. क्रांतीने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले असून तिने दिग्दर्शित केलेला 'काकण' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 11 मार्च रोजी मुंबईत एका शानदार सोहळ्यात क्रांतीने आपल्या सिनेमाचे म्युझिक लाँच केले. तिच्या या नवीन सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला आवर्जुन उपस्थिती लावली होती. अभिनेते महेश कोठारे, केदार शिंदे, संजय जाधव आणि भरत जाधव यांनी 'काकण'चे म्युझिक लाँच केले.
कृष्णराज फिल्म्सच्या सचिन शिंदे यांची पहिली निर्मिती असलेल्या 'काकण' या आगामी सिनेमात अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे आणि जितेंद्र जोशी मेन लीडमध्ये आहेत.
या म्युझिक लाँचला उर्मिलाचे संपूर्ण कुटुंब म्हणजेच तिचे सासू सासरे आणि पती आदिनाश कोठारे उपस्थित होते. याशिवाय अभिनेता भरत जाधव सपत्नीक आले होते. क्षिती जोगदेखील पती हेमंत ढोमेसह येथे पोहोचली होती. सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, केदार शिंदे, फुलवा खामकर, संगीकार अमित राज, निर्माते नानूभाई, कोरिओग्राफर उमेश जाधव, सई ताम्हणकर, अशोक शिंदे, आदिती सारंगधर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
'काकण' ही एक लव्ह स्टोरी असून सिनेमाची कथा क्रांती रेडकरने स्वतः लिहिली आहे, तर पटकथा- संवाद क्रांती रेडकर आणि ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात या सिनेमाचे थीम साँग रेकॉर्ड करण्यात आले आहे. सिनेमाचे थीम साँग ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिले असून इतर तीन गाणी क्रांती रेडकर आणि ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिली आहेत. या सिनेमात एकूण 4 गाणी असून ही गाणी वेगवेगळ्या प्रकारातील आहेत. संगीतकार अजय सिंघा यांनी सिनेमातील गीतांना संगीत दिले असून स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, श्रीराम अय्यर यांच्या सुमधुर आवाजात सिनेमातील इतर गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'काकण'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात जमलेली मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी...