आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी केले \'निळकंठ मास्तर\' फिल्मचे Music Launch, जावेद अलीचे केले कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोझी होम्सची प्रस्तुती असलेल्या, अक्षर फिल्म्स निर्मित ‘निळकंठ मास्तर’ ह्या सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत आयोजित केला होता. ह्या सोहळ्याला राज ठाकरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. राज ठाकरे ह्यांचे आजच्या पिढीतले सर्वात आवडते संगीत दिग्दर्शक अजय-अतुल ह्यांनी ‘निळकंठ मास्तर’ला संगीत दिलंय, एवढंच नाही, तर गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा चित्रपट असल्याने राज ठाकरे या संगीत अनावरण सोहळ्याला उपस्थित होते.
चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. १९४२ ते १९४७च्या शेवटच्या पाच वर्षांचा काळ ह्या सिनमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वांतत्र्य चळवळ आणि त्यात असलेली निळकंठ मास्तरची प्रेमकथा आपल्यासमोर उलगडत जाणार आहे. चित्रपटात निळकंठ मास्तरच्या मध्यवर्ती भूमिकेत ओम्कार गोवर्धन आहे. तर विश्वनाथच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, विश्वनाथच्या बायकोच्या यशोदाच्या भूमिकेत नेहा महाजन, आणि इंदुच्या भुमिकेत पुजा सावंत आपल्याला दिसेल.
चित्रपटाला साजेशी चार गाणी अजय-अतुल यांनी संगीतबध्द केली आहेत. त्यापैकी ‘वंदे मातरम’ ह्या गाण्याची खासियत आहे, की ह्यात १५ गायकांनी एकत्र मिळुन हे गाणं गायलंय.
चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलताना अजय-अतुल सांगतात, “हा गजेंद्र अहिरे ह्यांच्यासोबत आमचा पहिला चित्रपट. ह्यात 1940चा काळ दाखवायचा होता. तो उभा करायला,१९४०ला साजेसं संगीत देतानाच २०१५तल्या प्रेक्षकासाठी ते संगीत बनवायचंय आणि त्यांना कंटाळवाणं होणार नाही, असं संगीत देण्याची आमच्यावर जबाबदारी होती. त्यात सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे, ‘वंदे मातरम’ सारख्या गाण्याला संगीत देण्याची आमच्यावर जबाबदारी होती. ह्या गाण्याचा बाज मराठी ठेवतानाच ते इंटरनॅशनलही वाटावं असं असणं आवश्यक होतं. त्यातली भव्यता जपतानाच त्यातलं मांगल्य कायम राखणं गरजेचं होतं. त्यामुळे ४०च्या दशकात नेणा-या चित्रपटाचे संगीत हे आम्ही ८०च्या दशकातल्या फिल्म संगीताच्या ट्रेंडप्रमाणे दिलंय. आणि अजून एक गोष्ट प्रामाणिकपणे आम्ही सांगू इच्छितो की, आरडी आणि एसडी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ह्यांच्या स्टाइलचं संगीत आम्ही दिलंय असं कानसेनांना वाटण्याची शक्यता आहे, कारण ह्याच दिग्दजांचं ७० आणि ८०च्या दशकातलं संगीत ऐकत आम्ही मोठे झालोयत.”
(सर्व फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा काय म्हणाले राज ठाकरे अजय-अतुल आणि जावेद अलीविषयी