आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW PICS : पाहा 'टाइमपास 2'च्या दिमाखदार म्युझिक लाँच सोहळ्याची खास क्षणचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी आणि उर्मिला कानेटकर-कोठारे परफॉर्म करताना..)

पुणेः पुण्याच्या कला-क्रिडा संकुलात 'टाइमपास 2'चा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच मोठ्या दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला. संगीतकार अजय- अतुल यांनी सिनेमाच्या संगीताचे अनावरण केले. 'नटरंग', 'बालक-पालक' यांसारखे दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'टाइमपास' या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय सुरु केला आहे. आता याच सिनेमाचा पुढचा भाग म्हणजे 'टाइमपास 2' हा सिनेमा 1 मे 2015 रोजी प्रदर्शित होणार आहे.

म्युझिक लाँच सोहळ्यात मराठी-हिंदीतील अनेक कलाकारांनी धमाकेदार परफॉर्मन्सेस देऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी 'टाइमपास'ची जोडी केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब तसेच 'टाइमपास 2' मध्ये मोठ्या दगडुची व्यक्तिरेखा साकारणारा प्रियदर्शन जाधव यांचे परफॉर्मन्सेस हे मुख्य आकर्षण ठरले.
'फुल्ल 2 टाइमपास' या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिध्द अभिनेत्री आणि नृत्यांगना उर्मिला कानेटकरच्या नृत्याने झाली. पंचतुंड नररुंडमालधर आणि नटरंग या गाण्यांवर तिने सादर केलेल्या नृत्याने सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले. यानंतर स्वप्निल बांदोडकरने 'मला वेड लागले प्रेमाचे' गाऊन पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर आपल्या सुरेल स्वरांची मोहनी घातली. प्रथमेश आणि केतकीने 'फुलपाखरु' आणि 'कल्ला' या गीतांवर नृत्य सादर केले. अभिनेत्री अमृता खानविलकरच्या 'शिट्टी वाजली' आणि सोनाली कुलकर्णी हिच्या 'ही पोळी साजूक तुपातली' या तुफान नृत्याने प्रेक्षकांना थिरकायला लावले.

बेला शेंडे, महालक्षमी अय्यर, शाल्मली खोलगडे, अपेक्षा दांडेकर, आदर्श शिंदे यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. या सोहळ्याचे प्रक्षेपण 5 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता झी टॉकीजवर होईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, मराठी कलाकारांच्या धमाकेदार परफॉर्मन्सेसची एक छोटीशी झलक...