आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सिद्धांत\'च्या म्युझिक लाँचला मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महेश मांजरेकर, तेजस्विनी पंडीत, सचिन पिळगावकर, मनवा नाईक)

'शाळा', 'अनुमती', 'फॅन्ड्री' या एकाहून एक सरस कलाकृती तयार करणा-या 'नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल' या निर्मिती संस्थेच्या आगामी 'सिद्धांत' या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला विक्रम गोखले, महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, तेजस्विनी पंडीत, जितेंद्र जोशी, शरद केळकर, स्वाती चिटणीस यांच्यासह बरीच मंडळी उपस्थित होती. नाते संबंधातील गणितावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
गणित हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या पचनी पडत नाही. पण अभ्यासातील या गणिताचा आयुष्यातील नात्यांशी ही तेवढाच जवळचा संबंध आहे. नाती जमतात म्हणून गणित सुटतात, का गणित सुटतात म्हणून नाती जमतात, त्यामुळेच गणित हा विषय जरी आवडत नसला तरी आयुष्यातील नाती टिकविण्यासाठी गणितासारख्या पद्धतीशी मैत्री करण्याशिवाय काही पर्याय नाही. एकंदरीतच नाते संबंधातील गणितावर भाष्य करणारा असा 'सिद्धांत' सिनेमा असून सिनेमाचे दिग्दर्शन विवेक वाघ यांनी केले आहे.
'सिद्धांत' सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, गणेश यादव, किशोर कदम, स्वाती चिटणीस, नेहा महाजन, सारंग साठे, माधवी सोमण आणि बालकलाकार अर्चित देवाधर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शेखर संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात एक गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.
पुढे पाहा, म्युझिक लाँच सोहळ्याला जमलेली मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी..