आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टाइमपास 2\'चे थाटात म्युझिक लाँच, सेलिब्रिटींच्या परफॉर्मन्सेसनी सोहळ्याला लागले चारचाँद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवी जाधव दिग्दर्शित आणि बहुप्रतिक्षित 'टाइमपास 2 या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच पुण्यात मोठ्या दिमाखात पार पडला. पुण्याच्या कला-क्रिडा संकुलात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मराठी आणि हिंदीतील आघाडीची संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी टाइमपास 2 चे म्युझिक लाँच केले. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
अजय-अतुल यांनीच रवी जाधव यांच्या पहिल्या सिनेमाचे म्हणजे नटरंगचे अजरामर संगीत दिले.
रवी जाधव यांनी सोशल मीडियावर याविषयी माहिती देताना लिहिले, ''ज्यांनी माझ्या पहिल्या सिनेमाचे म्हणजेच 'नटरंग' चे अजरामर संगीत दिले त्या अजय-अतुलच्या शुभ हस्ते माझ्या पाचव्या सिनेमाचे म्हणजेच 'टाइमपास २' चे संगीत अनावरण झाले हा खूपच सुंदर योग होता!!! यासाठी Essel Vision Pvt. Ltd. व Zee Talkies चे आभार!!!''
'टाइमपास' या सिनेमाचा हा सिक्वेल असून दगडू आणि प्राजक्ताच्या भूमिकेत अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. येत्या 1 मे रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'टाइमपास 2'च्या म्युझिक लाँच सोहळ्याची निवडक क्षणचित्रे...