आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नील जोशीचा नवा सिनेमा \'वेलकम जिंदगी\', सलीम खान यांनी केले म्युझिक लाँच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रे - वर डावीकडून -स्वप्नील जोशी आणि सलीम खान, सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी, म्युझिक लाँच करताना सलीम खान आणि अन्य, स्वप्नील जोशी)

मराठी सिनेरसिकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'वेलकम जिंदगी' हे त्याच्या नवीन सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर स्वप्नील जोशीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाचे अलीकडेच मुंबईत म्युझिक लाँच करण्यात आले. बॉलिवूडमधले अनेक क्लासिक सिनेमे ज्यांच्या लेखणीतून साकारले त्या सलीम खान यांच्या खास उपस्थितीत सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. उमेश घाडगे दिग्दर्शित या सिनेमाचे अमित राज संगीतकार आहेत.
या म्युझिक लाँचला सलीम खान, स्वप्नील जोशी, अमितराज, दिग्दर्शक उमेश घाडगे यांच्यासह अभिनेत्री सई ताम्हणकर, सुशांत शेलार, रागेश्वरी सचदेव, विजय पाटकर यांची उपस्थिती होती.
सतत आत्महत्येचा विचार करणा-या तरुणीला जीवन जगण्याचा नवीन दृष्टिकोन देणा-या तरुणाची भूमिका स्वप्नीलने सिनेमात साकारली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्वप्नील आणि अमृता खानविलकर ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे. येत्या जूनमध्ये हा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीस येतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'वेलकम जिंदगी'च्या म्युझिक लाँच सोहळ्याची खास छायाचित्रे....