युद्ध या सिनेमाचा शानदार म्युझिक लाँच समारंभ नुकताच कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सिनेमातील सर्व गाणी श्रवणीय आहेत व ती रसिकांना नक्कीच आवडतील असा विश्वास निर्माते शेखर गिजरे यांनी याप्रसंगी बोलून दाखवला. सिनेमाच्या म्युझिक टीमने ही संगीत करतानाचा सुखद अनुभव यावेळी प्रेक्षकांसोबत शेअर केला.
या सिनेमात एकूण चार गीते असून ती जाफर सागर यांनी लिहिली आहेत. या गीतांना विवेक कार यांचे संगीत लाभले आहे. ‘चल दूर दूर’, ‘देवा सांगना’, ‘देवा गणेशा’, अनप्लग ‘चल दूर दूर’ अशा चार गीतांची मेजवानी या सिनेमात आहे. या गीतांना आदर्श शिंदे, स्वाती शर्मा, प्रताप, देव नेगी यांच्या स्वराचे कोंदण लाभले आहे.
शेखर गिजरे निर्मित राजीव रुईया दिग्दर्शित ‘युद्ध’ एक अस्तित्वाची लढाई हा सिनेमा बोकाळलेला भ्रष्टाचार, अत्याचार त्यात सर्वसामान्य माणसाची होणारी ससेहोलपट, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा राग यावर भाष्य करतो.
राजेश शृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर, पंकज विष्णू, वर्षा उसगांवकर, स्मिता ओक, संजय कुलकर्णी, सोमनाथ तडवलकर, शीतल मंत्री यांच्या भूमिका या सिनेमात आहेत. श्रद्धा एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेला हा सिनेमा १५ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या म्यूजिक लाँचिंग इव्हेंटमध्ये कोण-कोणते मराठी कलाकार उपस्थित होते...