आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफर बालपणीच्या आठवणींच्या किल्ल्याची!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'किल्ला' सिनेमाचे पोस्टर्स - Divya Marathi
'किल्ला' सिनेमाचे पोस्टर्स
रोजच्या धावपळीत, वयाबरोबरच वाढत जाणाऱ्या जबाबदारीतून या धकाधकीच्या जीवनात, ‘लहानपण देगा देवा’ असं नकळत आपल्याला वाटणं साहजिक आहे. ‘बालपणीचा काळ किती सुकर होता’ लहान असताना हे पटत नाही, पण मोठे झाल्यावर हे पटवून घेतलं तरी काही करूही शकत नाही. बालपणीच्या आठवणींना हृदयाच्या कप्प्यात मात्र कायम हक्काचे स्थान मिळते. आपली शाळा, आपले जुने मित्र, खेळाचे मैदान, राहते घर, शिक्षक, शेजार इत्यादी गोष्टी आपल्याला पुन्हा लहानपणीच्या गोड आठवणींमध्ये घेऊन जातात, छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद किती निरागस होता हे मोठं झाल्यावर उमगतं.
आठवणींच्या अभेद्य किल्याभोवती असणारी बालपणीच्या आनंदाची ही तटबंदी मजबूत करणाऱ्या या काही गोष्टी –
खासमखास मित्र –
आपल्या सुःखदुःखात आपली नेहमी सोबत देणारा, आपल्या सावलीसारखा असा एक खास मित्र आपल्या बालपणी असतोच असतो. त्याच्या निरागस मैत्रीची सुखावणारी सावली आपल्याला आयुष्यभर स्मरते.
आईचे प्रेम –
आईच्या प्रेमाला कशाचीही उपमा देणं कठीण! तिच्या मायेची उब, काळजी, कधी कधी धपाटे आणि सागराएवढं प्रेम आपल्याला कायम हवंहवंसं वाटत राहते. आईनेच बालपणी दिला या कच्च्या मडक्याला आकार! तिच्या उपकारांची परतफेड होणं शक्यचं नाही.
शाळा –
आपल्या आयुष्यातील पाहिलं आणि सर्वात प्रेमाचं वळण म्हणजे शाळा. संपूर्ण आयुष्यभरशाळेतील धमाल, अभ्यास, वर्ग, मज्जा, परीक्षा, शिक्षक, मित्रमंडळी सगळं कसं लख्ख आठवतंराहतं. आज शाळेची इमारत पाहिल्यावर गहिवरून येतं आणि मनात ‘आठवणींचा तास’ सुरु होतो.
जिव्हाळ्याची वस्तू –
हट्ट करून, आई-बाबांच्या मागे लागून लागून मिळवलेल्या गोष्टीची मज्जा काही औरच होती. बालपणी एखादं खेळणं, बत, सायकल, बाहुली अशा गोष्टींपैकी एखादी गोष्ट तरी आपल्या आयुष्याचा भाग बनून गेली होती. जिव्हाळ्याने जपलेल्या त्या वस्तूला इजा पोहचू न देण्याची आपली धडपड विसरणे कर्मकठीण!
मित्रांचा कल्ला –
लहानपणी मित्रांसोबत मिळून केलेली मज्जा कशी काय विसरता येईल. मित्र म्हणजे जीव की प्राण होते. आपल्या प्रत्येक आनंदात सरमिसळून जाणारे मित्र आणि त्यांच्यासोबत साजरा केलेला प्रत्येक क्षण म्हणजे एका सोहळ्यासमान!
अशाच बालपणीच्या गोड आठवणींची सफर घडवून आणणारा दर्जेदार मराठी सिनेमा‘किल्ला’ पहा DittoTV (http://www.dittotv.com/movies/killa) वर आणि बालपणीच्या आठवणींचा ‘अजिंक्य’ किल्ला अनुभवा.