आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Fans Calls Me Hot And Sexy Now Because Of My Film Guru, Says Urmila Kothare

‘मला Fans म्हणतात Hot & Sexy\' सांगतेय ‘मँगो डॉली’उर्मिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उर्मिला कोठारे सध्या महाराष्ट्रातल्या वेगवेगगळ्या शहरांमध्ये जाऊन तिच्या आगामी गुरू चित्रपटाचं प्रमोशन करतेय. फिल्म प्रमोशनमध्ये तिला सध्या खूप वेगळाच अनुभव येतोय.
Divyamarathi.comशी हा अनुभव शेअर करताना उर्मिला म्हणते, “फिल्म प्रमोशनसाठी सिटी टूर्स मला काही नवीन नाहीत. चाहत्यांपर्यंत ह्या सिटी टूर्समूळे आम्ही पोहोचू शकतो. त्यांच्याशी संवाद साधतो. ब-याचदा ह्या प्रमोशनल टूर्समूळे आपल्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल काय वाटतं, ते आम्हांला ह्यातून कळतं. पण ‘गुरू’साठी मी केलेली सिटी टूर ह्या अगोदरच्या टूर्सपेक्षा खूप वेगळी आहे. कारण चाहत्यांचा माझ्याबद्दलचा बदललेला दृष्टिकोण मला ह्यातून जाणवतोय.”
ती सांगते, “मी कोणताही चित्रपट केला तरीही, मला माझ्या दिसण्याविषयी आणि अभिनयाविषयी साधारणपणे ‘तुम्ही किती सुंदर दिसता. किती छान अभिनय करता.’ अशाच प्रतिक्रिया यायच्या. मी फारच आवडले तर, ‘किती सात्विक, सोज्वळ चेहरा आह तुमचा. तुम्ही किती सक्षम अभिनेत्री आहात’ असं लोकं बोलायचे. पण आता गुरूचे प्रोमो लोकांनी पाहिल्यापासून ‘ You are so Hot’, ‘You are so sexy’, ‘I want this mango dolly’ अशा प्रतिक्रिया येऊ लागल्यात.”
उर्मिला ह्या प्रतिक्रिया आठवून हसून सांगते, “माझ्या प्रेक्षकांनी असा संवाद साधण्याची मला सवयच नाहीये. पहिल्यांदा मला थोडं आश्चर्य वाटलं. कदाचित काही लोकं माझ्यासमोर थोडी बुजूनही जातात. अनेकांना मी विवाहित असल्याचंही माहित असल्याने असावं कदाचित, लोकं माझ्याशी बोलताना मॅम असं संबोधतात. पण शेवटी दबकत दबकत हळूच मी किती हॉट दिसते असं मला सांगून टाकतातच. पण मी ह्या सगळ्याला क़म्पलिमेन्ट म्हणूनच पाहते. मी सात्विकही दिसू शकते आणि हॉट ही दिसू शकते, हेच ह्यातून सिध्द होतंय. आणि शेवटी कोणत्याही अभिनेत्रीला आपल्या करीयरमध्ये असं दिसणं गरजेचं असतं.”
ती पूढे म्हणते, “मँगो डॉली माझ्यासाठी इमेज चेंजर झालीय. ‘मँगो डॉली’ हे माझं नाव ह्या चित्रपटातलं नाव इतकं लोकप्रिय होईल, हेही खरं तर आम्हांला वाटलं नव्हतं. हे नाव छान वाटलं म्हणून ठेवलं. पण ते लोकांच्या पटकन लक्षात राहिलं. त्यामूळे आता ही फिल्म रिलीज झाल्यानंतरच्या पब्लिक अपिअरन्सबद्दल मी खूप एक्सायटेड आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गुरू चित्रपटातलं 'तू माझी मँगो डॉली' गाणं