आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझ्या लग्नाचं डेकोरेशन मालिकेत झालं कॉपी’, सांगतेय मृणाल दूसानिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असं सासर सुरेख बी मालिकेत नुकतंच जुई इनामदारचं लग्न जालं. त्यावेळी ह्याचवर्षी फेब्रुवारीत लग्न झालेल्या मृणाल दुसानिसला तिच्या लग्नाची आठवण झाली. ह्याला कारणही तसंच आहे. ‘असं सासर सुरेख बाई’ मालिकेतलं मृणाल दूसानिसचं लग्न आणि तिच्या ख-या आयुष्यात झालेलं लग्न ह्यामध्ये बरंच साम्य आहे.
मृणालने तिच्या लग्नात नऊवारी साडी नेसली होती. मालिकेतल्या लग्नातही तिने नऊवारी साडीचं नेसलीय. एवढंच नाही, तर मृणालच्या लग्नात जसं डेकोरेशन केलं गेलं होतं, अगदी तसंच डेकोरेशन तिच्या ह्या मालिकेतल्या लग्नातही केलं गेलं होतं.
नऊवारी साडीविषयी विचारल्यावर मृणाल म्हणाली, “सध्या लग्नात नऊवारी साडी घालायची फॅशन आहेच. आता शालूपेक्षा नववधूची पसंती नऊवारीला असते. म्हणूनच माझ्या लग्नातही मी नऊवारी साडी नेसले होते. आणि मालिकेतल्या लग्नातही आमच्या डिझाइनरने मला नऊवारी साडी नेसवली होती.”
डेकोरेशन कॉपी झाल्याचं मात्र ती कबूल करते. ती सांगते, “माझ्या ख-या आयुष्यातल्या लग्नात काही कमी राहू नये, ते आठवणीतलं राहावं, ह्यासाठी माझ्या वडिलांनी जातीने लक्ष घालून सगळं छान डेकोरेशन करवून घेतलं होतं. आणि ते डेकोरेशन एवढं अप्रतिम झालं की, ते आमच्या मालिकेचे निर्माते शशांक सोळंकींना खूप आवडलं.”
मृणाल म्हणते, “शशांक माझ्या लग्नाला आले असताना, त्यांनी लग्नात केलेल्या डेकोरेशनचं कौतुक तर केलंच. पण तेवढंच नाही, तर त्यांनी त्याचवेळी मालिकेमध्ये जेव्हा यश-जुईचं लग्न होईल, तेव्हा तसंच डेकोरेशन करायचं ठरवलं होतं. आणि नुकतंच अगदी तसाच मांडव आणि तसंच छान, भव्य डेकोरेशन त्यांनी मालिकेत केलेलं आपण पाहिलंच आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मृणालच्या ख-या लग्नाचं डेकोरेशन आणि मृणालच्या असं सासर सुरेख बाई मालिकेमधल्या लग्नाचं डेकोरेशन
बातम्या आणखी आहेत...