आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ढोलकीच्या तालावर’ मधली नगरची ही contestant रडली स्टेजवर, का? जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स मराठीवरच्या ‘ढोलकीच्या तालावर’ ह्या डान्स रिएलिटी शोचा पहिलाच एपिसोड चित्रीत होत होता. आणि अकलुजची नाझनीन शेख मंचावर येताच तिला रडू फुटलं. लावणी करताना आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणा-या नाझनीनला अचानक काय झालं, हे सूत्रसंचालन करणा-या सुबोध भावेलाही क्षणभर कळेना. शेवटी काही क्षणातच नाझनीन सावरली.
Divyamarathi.comशी बोलताना नाझनीन म्हणाली, “नगर सारख्या भागातून एवढ्या मोठ्या रिएलिटी शोपर्यंतचा प्रवास हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला डान्सची उपजतच आवड होती. पण वडिलांचा माझ्या डान्सला विरोध, त्यामुळे इतर मुलींसारखे कधीही डान्स क्लास जॉइन केलेच नाही. पण माझ्या आईला मात्र मी डान्समध्ये आपलं नाव कमवावं, असं नेहमी वाटायचं. जेव्हा जेव्हा टीव्हीवर कोणत्या डान्स-रिएलिटी शोमध्ये कोणी नाचत असले, तर तो नाच पाहून ती मला विचारायची, इथे तू असतीस, तर ही स्टेप तू कशी केली असतीस? ह्या टीव्हीवरच्या स्पर्धकाप्रमाणे तू कपडे घालून किती छान दिसली असतीस. आई सतत माझ्यासाठी स्वप्न पाहत राहिली.”
नाझनिन शेख नगरमध्ये प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. अकळुजला नाझनीनने ‘ढोलकीच्या तालावर’साठी भर रस्त्यात डान्स सादर केला. तेव्हा तिचे आई-वडिलही तिथे तो डान्स पाहायला आले होते. स्टेजवर ह्याविषयीचा अनुभव सांगताना नाझनीनच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
कार्यक्रम संपल्यावर ती दिव्यमराठीशी बोलत होती. ती म्हणाली, “मी खरं तर फारच भारावून गेले होते. त्यातच मी मंचावर आल्यावर त्यांनी जी व्हिज्युअल्स दाखवली त्यात आईचा चेहरा पाहून मला राहवलं नाही. आईचं स्वप्न मी पूर्ण केलं, ह्याची जाणीव झाली. आणि कंठ दाटून आला. माझी कला गॉडगिफ्टेड आहे, मी ती कोणाकडून शिकलेली नाही. मी डान्सिंगमध्ये करीयर करण्याची इच्छा बाळगताना मला आमच्या शहरातल्या ओळखीच्या अनेकांनी नाउमेद करण्याचा प्रयत्न केला.ते ही आठवलं."
ती पूढे म्हणते, "पण मला असं वाटतं, कलेला धर्माचं, जातीचं बंधन नसतं. लावणीसूध्दा हिपहॉपसारखा किंवा सालसा, बॅलेसारखा एक डान्स फॉर्म आहे. त्याला हिणवणं चुकीचं आहे. माझ्यासारख्या मुलींचा 'ढोलकीच्या तालावर' सारख्या मंचापर्यंतचा स्ट्रगल इतर डान्सरसाठी यशाची वाट सुकर व्हायला थोड्या प्रामाणात का होईना मदत करेल.”
नाझनीन रडल्यावर मानसी नाईकने तिला मंचावर येऊन मिठी मारली होती. नाझनीन म्हणते, “दिपालीताई आणि मानसीताईंनी माझ्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं आणि समजावलं. त्यामूळे अर्थातच आता मला हुरूप आलाय. पूढचे सगळे एपिसोड्स बाकी स्पर्धकांना टफ कॉम्पिटीशन देण्याच्या मी तयारीत आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मंचावर आल्यावर कसं आलं नाझनीन शेखच्या डोळ्यांत पाणी
(फोटो - स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...