आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nach Baliye 7चे विजेते हिमांशू आणि अमृताचे पडद्यामागील प्रेमळ क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता आणि हिमांशूचे रोमँटिक क्षण - Divya Marathi
अमृता आणि हिमांशूचे रोमँटिक क्षण

'नच बलिये 7'च्या विजेतेपदावर आपले नाव कोरणारी महाराष्ट्राची लेक आणि जावई अर्थातच अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांचा आनंद सध्या सातवे आसमानवर आहे. या जोडीने आपल्या नृत्याने केवळ परीक्षकांना इम्प्रेसच केले नाही, तर कधीही वादात न अडकण्याचा मानही पटकावला. हिमांशू आणि अमृता हे 'नच बलिये'मधील असे एक कपल होते, जे कधीही कोणत्या वादात अडकले नाहीत. केवळ आपल्या नृत्य आणि लव्ह केमिस्ट्रीने प्रसिद्धी एकवटली.
याचवर्षी 24 जानेवारी रोजी लग्नगाठीत अडकलेल्या या जोडप्यावर सोशल साइट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. लग्नाच्या केवळ आठ दिवसांतच या दोघांना या शोची ऑफर मिळाली आणि लग्नाला सहा महिने पूर्ण होत नाही तोच या शोच्या विजेतपदावर या दोघांनी आपले नाव कोरले. म्हणूनच अमृता माझी लकी मॅसकॉट असल्याचे हिमांशू अभिमानाने सांगतो.
यंदाच्या 'नच बलिये'मध्ये परीक्षकांनी सेलिब्रिटी कपल्सचा केवळ डान्सच नाही तर त्यांच्यातील बाँडिंगही तपासली. हिमांशू आणि अमृता या परिक्षेत खरे उतरले. त्याचे कारणच मुळात त्यांच्यातील प्रेम आणि सिझलिंग केमिस्ट्री आहे. या दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना या शोच्या माध्यमातून बघायला मिळालीच आहे. आता आम्ही तुम्हाला या क्यूट कपलची पडद्यामागची लव्ह केमिस्ट्री खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
चला तर मग पाहुयात, या क्यूट कपलचॆे पडद्यामागील रोमँटिक क्षण...