आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बाप-बेट्याच्या प्रसिध्दीचा झाला कोणत्या अभिनेत्याला त्रास? जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्राम साळवी आणि नागेश भोसले
स्टार प्रवाहच्या ‘देवयानी’ मालिकेतले सर्जेराव विखे पाटील आणि त्यांचा मुलगा संग्राम ही टीव्ही मालिकांमधील बाप-बेट्याच्या जोडीमधली एक लोकप्रिय जोडी आहे. मालिका संपून आता दिड वर्ष होऊन गेलंय. पण अजूनही अभिनेते नागेश भोसले आणि संग्राम साळवीला पाहिलं की, त्यांच्यासोबत फोटो काढायची संधी त्यांचे चाहते काही सोडतं नाहीत. आणि गेल्या वर्षी या दोघांनी मिळून ‘देवयानी’ मालिकेनंतर पून्हा एकत्र एका चित्रपटात काम केले. आणि त्या चित्रपटाच्या युनिटला या दोघांची मालिका संपली तरीही आजही किती प्रसिध्दी आहे, त्याचचं प्रत्यंतर आलं.
नागेश भोसले निर्मित-दिग्दर्शित-अभिनित ‘पन्हाळा’ ह्या चित्रपटात नागेश भोसलेंच्यासोबत आपण संग्राम साळवीला पून्हा एकदा पाहणार आहोत. पण आता सिल्व्हर स्क्रिनवर येताना या दोघांचं नातं बदललेलं दिसणार आहे. पन्हाळ्याला फिरायला आलेल्या पर्यटकाच्या भूमिकेत संग्राम दिसणार आहे. तर त्याचे गाइड बनलेत, नागेश भोसले.
नागेश भोसले यांच्या या चित्रपटात संग्राम साळवीसोबतच अमृता संत, समिधा गुरू आणि मकरंद देशपांडेही आहेत. आणि मकरंद संग्राम आणि नागेश यांच्या प्रसिध्दीविषयी सांगतात,”या दोघांची लोकांमध्ये एवढी प्रसिध्दी असेल, याची मला काहीच कल्पना नव्हती. आम्ही जेव्हा चित्रपटाच्या शुटिंगसाठी पन्हाळ्याला गेलो होतो, तेव्हा ह्या दोघांच्या प्रसिध्दीचा अक्षरश: आम्हांला त्रास झाला. पन्हाळ्याला शुटिंग करता करता कधी कधी जवळच्या गावातली लोकं येऊन आमच्या कार्यक्रमाला या ना, म्हणून या दोघांना आग्रह करायचे किंवा मग कधी चित्रीकरणावेळी आजूबाजूला असणारे पर्यटक येऊन सेल्फी काढायचे. खरं तर, या चित्रपटात, मी अभिनेता आणि नागेश दिग्दर्शक आहे. आणि चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्यांचे फोटो काढायला लोकं येतात.पण ह्या चित्रपटाच्यावेळी माझ्यापेक्षा माझ्या दिग्दर्शकाचीच प्रसिध्दी अधिक होती.”अशी शेजारी उभ्या असलेल्या नागेश भोसलेंना कोपरखळी मारत मकरंद देशपांडे आपल्याच स्टाइलमध्ये हसू लागतात.
पुढे मकरंद म्हणतात, “पण एकूणच ह्या दोघांसोबत काम करण्याचा मस्त अनुभव होता. पन्हाळाच्या शुटिंगला तर मी सुट्टीवर गेल्यासारखंच वागत होतो. एकतर मित्राची फिल्म, सेटवरचे सगळीच ओळखीची नटमंडळी, पन्हाळ्यासारखं निसर्गरम्य वातावरण आणि त्यात संपूर्ण चित्रपट पावसाळ्यामध्ये चित्रीत होणं, आता ही सगळी कारणं एकत्र आल्यावर माझा तर सुट्टीचाच मुड बनला होता.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संग्राम साळवी, नागेश भोसले स्टारर 'पन्हाळा' चित्रपटाची स्टारकास्ट