(फाइल फोटोः मराठी मॉडेल निकिता गोखले)
नागपूरः नागपूरजवळील तुमसरमध्ये जन्मलेल्या या मराठमोळ्या तरुणीचे नाव आहे निकिता गोखले. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निकिताने काही दिवसांपूर्वी 'प्लेबॉय' या आंतरराष्ट्रीय मेन्स मॅगझिनसाठी टेस्ट फोटोशूट करुन प्रसिद्धी मिळवली आहे.
गावातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत...
वयाच्या 17व्या वर्षी निकिता तुमसरहून नागपूरमध्ये दाखल झाली. तिची पहिली कमाई ही चारशे रुपये होती. मात्र इच्छाशक्ति आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली. काही दिवसांपूर्वीच तिने प्लेबॉय या आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. तिची ही छायाचित्रे मॅगझिनचे मालिक हग हेफनर यांना पाठवण्यात आली आहेत. निकिताच्या या फोटोशूटची निवड झाल्यास शर्लिन चोप्रानंतर प्लेबॉय या मेन्स मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकणारी निकिता दुसरी भारतीय मॉडेल ठरणार आहे. या फोटोशूटसाठी तिला मॅगझिनचे फोटोग्राफर रोल फ्रेंकलिन यांच्याकडून आमंत्रण मिळाले होते. फोटोशूटमध्ये तिने ब-याच हॉट पोज दिल्या आहेत.
निकिताचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे वडील स्टील वर्कशॉपमध्ये काम करते होते. नागपूरमधील जीएस कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या निकिताने काही जाहिरातींसाठी मॉडेलिंग केले आहे. काही दिवसांतच ती एका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी कॅलिफोर्नियाला जाणार आहे. तिने मॉडेलिंगशिवाय अनुपम खेर इन्स्टिट्यूटमधून अॅक्टिंगचा कोर्स केला आहे.
आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर फ्रेंकलिन यांनी केले फोटोशूट...
निकिताने टेस्ट फोटोशूटमध्ये बरेच बोल्ड सीन्स दिले आहेत. फोटोग्राफर फ्रेंकलिन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मॉडेल्सचे फोटोशूट केले आहेत. निकितासोबत त्यांची ओळख
फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. त्यांनीच तिला फोटोशूटची विचारणा केली होती. तिने होकार दिल्यानंतर मुंबईत हे फोटोशूट पार पडले.
लवकरच बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री...
निकिताने
आपल्या बोल्डनेसचे रहस्य आत्मविश्वास असल्याचे सांगितले. कॉलेज शिक्षण संपल्यानंतर तिने नोकरी करायला सुरुवात केली. त्यावेळी तिला चारशे रुपये पगार म्हणून मिळत होता. याच काळात मॉडेलिंगच्या ऑफर यायला सुरुवात झाली. तेथूनच करिअरला सुरुवात झाल्याचे निकिता सांगते. निकिता लवकरच पंजाबी, मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या विविध फोटोशूट्समधील निकिताचा बोल्ड अंदाज...