आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagraj Manjule And Ajay Atul's Zingaat Dance On Sairat Music Launch

VIDEO: जाळ अन् धूर संगटच.. पाहा नागराज मंजुळे, अजय-अतुलचा झिंगाट डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच मुंबईत 'सैराट' या आगामी मराठी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. म्युझिक लाँचनंतर एका धमाल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी संपली. उपस्थित सर्वजण खान-पानचा आस्वाद घेण्याच्या मूडमध्ये होते. तर काही जण घरी जाण्याच्या तयारीत होते आणि अचानक 'झिंगाट' गाणं सुरु झालं. मग काय स्टेजचं रुपांतर डान्स फ्लोअरमध्ये झालं. अजय-अतुल, नागराज मंजुळे यांच्यासह यावेळी सर्वच जण बेभान होऊन थिरकले. अगदी मनसोक्तपण सर्वांनी थिरकण्याची मजा अनुभवली. या झिंगाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि तुम्हीही पाहा, सेलिब्रिटींच्या झिंगाट डान्सची खास झलक...