आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

... आणि नागराज म्हणाले, 'सैराटवर बोलून आता वैताग आला'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून फक्त आणि फक्त सैराटवर बोलून आता आपण वैतागल्याची उद्विग्न प्रतिक्रीया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली आहे. सैराट सिनेमा करुन मी चुकलो की काय असा प्रश्न पडतो. सिनेमाला सुळावर चढवा, पण माझ्या पिच्छा सोडा, असे नागराज काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. आता पुन्हा एकदा सैराटवर काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
बुधवारी पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तिसऱ्या स्मृतीदिना निमित्तानं विवेक लघुपट महोत्सव आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागराजनी आपली भावना व्यक्त केली. या महोत्सवात जवळपास २६४ लघुपट दाखल झाले आहेत. त्यातील फक्त ४० लघुपट दाखवण्यात येणार आहेत. विवेक लघुपट महोत्सवासाठी आज उमेश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, हमीद दाभोलकरांसह इतर मान्यवर हजर होते.

सैराटला मिळालेलं भरघोस यश हे खुद्द दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या मनात ही नव्हतं. पण सैराटला मिळालेला प्रतिसाद हा नक्कीच धक्कादायक आहे. सैराट या एका सिनेमानंतर रिंकु आणि आकाशला देखील भरपूर लोकप्रियता मिळाली.

पुढे वाचा, महिन्याभरापूर्वी काय म्हणाले होते मंजुळे...
बातम्या आणखी आहेत...