आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फॅण्ड्री' फेम नागराज मंजुळे चक्क दहावीत दोनदा झाले होते नापास, शेअर केली मार्कशीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नागराज मंजुळे यांची दहावीची मार्कशीट, इनसेटमध्ये नागराज मंजुळे)
असं म्हणतात की, दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी करिअरची दिशा ठरवत असतात. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढे काय करायचे या विचारात आहेत. मात्र दहावीच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अपयशालासुद्धा सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे नापास झालेले विद्यार्थी कदाचित खचून गेले असतील. मात्र एका परीक्षेत अपयशी ठरल्याने आयुष्याच्या परीक्षेतसुद्धा अपयशी ठरु असे वाटून घेण्याची मुळीच गरज नाहीये.
मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या फेसबुक पेजवर स्वतःची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. त्यांची मार्कशीट बघून कदाचित ब-याच जणांना विश्वास बसणार नाही, की ते दहावीत चक्क दोनदा नापास झाले होते. त्यांनी मार्कशीट शेअर करुन एक सकारात्मक संदेश दिला आहे. त्यांनी म्हटले, ''मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर… मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस. सी. , यु. पी. एस. सी.… परीक्षा कुठलीही असो ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही…''
एकंदरीतच नागराज मंजुळे यांच्याप्रमाणे असे अनेक दिग्गज आहेत, जे शालेय जीवनात अपयशी ठरले मात्र आपापल्या क्षेत्रात आज त्यांनी आपले मोठे नाव केले आहे.
नोट: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाला. यंदा 10 वीचा एकूण निकाल 97.32 टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत टक्केवारी 2 टक्क्यांनी घटली आहे. 12 वी प्रमाणे 10 वीतही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, निकाल लागल्यानंतर जल्लोष करतानाची विद्यार्थ्यांची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...