आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडला \'सैराट\' करण्यासाठी नागराज सज्ज! बिग बींबरोबर चित्रपटाची जोरदार चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सैराट चित्रपटाने मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही प्रसिद्ध झालेला नागराज मंजुळे आता हिंदी चित्रपट करणार असल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे नागराज मंजुळे या चित्रपटात बिग बींबरोबर काम करणार असल्याचे नागराजच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले आहे. नागराज मंजुळे यांचा हा आगामी चित्रपट सामाजिक विषयावर आधारित राहणार असून, लवकरच यावर काम सुरू होणार असल्याचेही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. 

अद्याप नागराज मंजुळे किंवा बिग बी यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सैराट चित्रपटाच्या रिलीजनंतरही ही चर्चा जोरावर होती. मात्र पुढे त्याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. आता पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला असून, या चित्रपटाच्या स्क्रीप्टचे काम पू्र्ण झालेले असून, लवकरच त्यावर काम सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

बिग बींनी केले होते सैराटचे कौतुक, परशाने विचारले होते, एवढ्या उशीरा का पाहिला.. वाचा पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...