आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'नकळत सारे घडले\' मालिकेतील कलाकारांनी केक कापून सेलिब्रेट केले स्क्रिनिंग, स्वप्नील जोशीही होता उपस्थित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'नकळत सारे घडले' ही मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे या मालिकेचा निर्माता अभिनेता स्वप्निल जोशी असल्याने या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुक्ता होती. अभिनेत्री नुपूर परुळेकर आणि अभिनेता हरीश दुधडे यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेतील लहान मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

 
 'नकळत सारे घडले' या टीमने या मालिकेचा पहिला भाग सर्वांनी मिळून बघितला आणि अनोखे असे स्क्रिनींग सेलिब्रेत केले. यावेळी टीमने एक खास केकही मागवला होता आणि मालिकेतील बालकलाकार सन्वी रत्नालीकरने तिच्या चिमुकल्या हातांनी केक कापला. स्वप्निल जोशीने यावेळी सर्व टीमसह धम्माल केली. 
  
आता 'नकळत सारे घडले' ही मालिका प्रेक्षकांना किती आवडेल हे येणारा वेळच सांगेल पण तोपर्यंत पाहूया या मालिकेच्या स्क्रिनींगचे ऑन सेट फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...