आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लेक माझी लाडकी'तून घराघरांत पोहोचली ही अॅक्ट्रेस, आजींनी काढला सोबत सेल्फी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' या मालिकेतील नायिका असलेली सानिका चाहत्यांची दाद मिळवत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या नक्षत्रा मेढेकरला तिच्या फॅन्सनी भेटून तिच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. आपली भूमिका प्रेक्षकांना आवडतेय, याचे काही अनुभव नक्षत्राला नुकतेच आले. गणेशोत्सवानिमित्त नक्षत्रा खरेदीसाठी ठाण्यातल्या एका मॉलमध्ये गेली होती. तिथं तिला एका आजींनी ओळखलं. इतकंच नाही, तर आपल्या सुनेला आणि नातीला बोलावून घेतलं. त्या तिघींनाही तिचा अभिनय आवडत असल्याचं आवर्जून सांगितलं आणि तिच्याबरोबर सेल्फीही काढला. 
 
त्यापूर्वी नक्षत्रा नगरला एका इव्हेंटसाठी गेली होती. नगरमधील एका रेडिओ स्टेशनवर तिची मुलाखत होती. त्या रेडिओ स्टेशनवरील आरजे चैतालीला नक्षत्रा अर्थात सानिका आल्याचं माहीत नव्हतं. मात्र, नक्षत्राला पाहिल्यावर ती एकदम खूश झाली. ती नक्षत्राची खूप मोठी फॅन होती. त्यामुळे त्या दोघींनी मालिका, सानिकाची व्यक्तिरेखा या विषयी गप्पा मारल्या.

पुढे वाचा, काय म्हणाली नक्षत्रा... 
बातम्या आणखी आहेत...