आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Nakul Ghanekar Playing New Hegadi Pradhan In Jai Malhar

अतुल अभ्यंकरांच्या निधनानंतर नकुल घाणेकर साकारणार \'जय मल्हार\'मध्ये हेगडी प्रधानांची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हेगडी प्रधानांच्या भूमिकेत अभिनेता नकुल घाणेकर)

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ मध्ये हेगडी प्रधानांची भूमिका करणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे आकस्मिक निधन झाले आणि अवघ्या मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली. आपल्या आवडीच्या कलाकाराच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला. अशा दुःखद प्रसंगात सहकलाकार आणि संपूर्ण टीमचं सावरणं खूप अवघड असतं, पण प्रेक्षकांना दिलेलं मनोरंजनाचं वचन पाळणंही तेवढंच गरजेचं असतं. अशा स्थितीत “शो मस्ट गो ऑन” म्हणत काही गोष्टींची नव्याने जुळणी आणि सुरुवात करावीच लागते. हेगडी प्रधानांच्या भूमिकेबाबतही आता हेच घडणार असून ही लोकप्रिय भूमिका आता अभिनेता नकुल घाणेकर साकारणार आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडेरायांचे प्रधान असलेले हेगडी प्रधान हे विष्णूंचा अवतार होते. खंडेरायांच्या राज्यकारभारात आणि वैयक्तिक आयुष्यातही कायम साथ देणारी ही व्यक्तिरेखा त्यामुळे मालिकेतही त्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची होती. मालिका सुरू झाल्यापासून अतुल अभ्यंकर हेगडी प्रधान साकारत होते. पण त्यांच्या अकाली निधनाने ही भूमिका नकुल घाणेकर या तरूण अभिनेत्याला मिळाली.
या भूमिकेविषयी काय म्हणतोय नकुल घाणेकर, जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...