आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता अशी दिसते सलमानची ही अभिनेत्री, साऊथ इंडियन अभिनेत्यासोबत थाटला संसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क -  पूर्वाश्रमीची मिस इंडिया आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर आपल्या सर्वांना माहितच आहे. नम्रता गेले अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. गोड चेहऱ्याची नम्रताला आता पाहिले तर तुम्हाला ती लवकर ओळखुही येणार नाही. बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पा आणि नम्रता या सख्ख्या बहिणी आहेत. आज शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त तिची लहान बहीण आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या वैयक्तीक आयुष्यावर एक नजर टाकूया. वास्तव सिनेमादत बनली होती संजय दत्तची प्रेयसी...

 

महेश मांजरेकर यांच्या 'वास्तव' या सिनेमात संजय दत्तच्या प्रेयसीची भूमिका करणारी अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या लुकमध्ये आता फारच फरक झाला आहे. 22 जानेवारी, 1972 रोजी जन्मलेली नम्रता 1993 साली मिस इंडियाचा ताज जिंकून लोकप्रिय झाली होती. मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धत ती पाचव्या स्थानावर होती. ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर काही वर्षे मॉडेलिंग करुन नम्रता सिनेसृष्टीकडे वळली होती. मात्र आता नम्रता लाइमलाइटपासून दूर गेली आहे.


साऊथ इंडियन  अभिनेत्यासोबत थाटला संसार...

बॉलिवूडनंतर नम्रता साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळली. 2000 मध्ये तेलगू फिल्म ‘वामसी’च्या शूटिंगच्या काळात तिची भेट साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत झाली. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर फेब्रुवारी 2005 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. महेश बाबू नम्रतापेक्षा वयाने तीन वर्षांनी लहान आहे. महेश आणि नम्रता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गौतम हे त्यांच्या मुलाचे तर सितारा हे मुलीचे नाव आहे.

 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, नम्रता शिरोडकरविषयी काही खास गोष्टी..

बातम्या आणखी आहेत...