आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Well Known Actor Nana Patekar Doing Marathi Play Natasamrat

Exclusive: नाना बनवणार 'नटसम्राट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वि. वा. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट' या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी साकारलेली ही भूमिका अजरामर झाली... आणि आता पून्हा एकदा 'नटसम्राट' नव्या रूपात नव्या कलाकारांसह रंगभूमीवर येणार आहे. हे नाटक पुन:रूज्जीवीत करण्याचा विडा उचललाय अभिनेते नाना पाटेकर यांनी.
नाना पाटेकर यांच्या गजानन चित्र या बॅनरखाली या नाटकाची निर्मिती होतेय. महेश मांजरेकर या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. श्रीराम लागू यांनी साकारलेली नटसम्राटाची मुख्य भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य उचलणं हे अतिशय मानाचं मानलं जातं. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते. त्यामुळेच आता या नाटकात नटसम्राटाच्या भूमिकेत कोण दिसणार हे विचारल्यावर नाना पाटेकर आपल्या खास स्टाइलमध्ये हसतात.. आणि “ते एक गुपित” असल्याचं सांगतात आणि “आत्ताच कशाला एवढी घाई” असं विचारून वेळ मारून नेतात.
नानांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात रंगभूमीपासूनच केली. गिधाडे, साखाराम बाइंडर, पुरूष सारखी त्यांची नाटकं खूप गाजली. आणि आता नाना पहिल्यांदा नाट्यनिर्मितीकडे वळतायत, आणि ते ही 'नटसम्राट'सारख्या नाटकाने म्हटल्यावर, नाट्यरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'नटसम्राट' या नाटकाची निवड करण्याबद्दल विचारलं असता ते सांगतात, “नटसम्राट नाटकाची संहिता कोणत्याही कलावंताला भूरळ घालणारी आहे. माझ्यावरही वि. वा. शिरवाडकर यांच्या या नाटकाने फार पूर्वीपासूनच मोहिनी घातलीय. त्यामुळेच या नाटकाची निर्मिती करण्याचं मी ठरवलं”.
नाना पाटेकर सुध्दा या नाटकात एका महत्वपूर्ण भूमिकेत असतील. नानांशिवाय, विक्रम गोखले, रीमा लागु, नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट या नाटकात पाहायला मिळणार आहे. हे नाटक 4 मार्चपासून रंगभूमीवर पदार्पण करतंय.