आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पद्मावती' विवादावर नाना पाटेकर यांनी दिली प्रतिक्रिया, 'मी कोणाला मारण्याचा विचारही करु शकत नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पद्मावती' विवादात रोज रोज नवनवीन सेलिब्रेटी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक सेलिब्रेटी यात त्यांचा पूर्णपणे सहभाग संजय लीला भन्साळी यांना देत आहेत. अगदी व्हॉट्सअपवरही पद्मावती विवादात भर घालणारे नवनवीन संदेश दिले जात आहेत. नुकतेच गोवा येथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडियाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी तेथे उपस्थित नाना पाटेकर यांना पद्मावती विवादावर त्यांचे मत विचारले त्यावेळी त्यांनी या प्रश्नावर मनमोकळे उत्तरे दिली. 

 

नाना पाटेकर म्हणाले की, "पद्मावती कॉन्ट्रोवर्सीवर प्रत्येकजण त्यांच्या परीने वेगवेगळे मत व्यक्त करत आहे. प्रसुन जोशी यांना चित्रपट पास होण्याअगोदर पत्रकारांनाल दाखवण्यात आला याबद्दल तक्रार आहे. भंसाळी यांनी सांगितले की जोपर्यंत चित्रपट रिलीज होणार नाही तोपर्यंत याबद्दल वाद-विवाद करुन काय उपयोग असा सवाल केला. त्यामुळे चित्रपट न पाहता कसाकाय विरोध करु शकतात हे मला समजले नाही." 

 
काही लोकांनी या चित्रपटावर बंदी आणली नाही तर दीपिकाचे नाक कापू, शीर धडावेगळे करु, संजय लीला भंसाळीला चप्पल मारु असे वक्तव्ये केली आहेत. यावर नानांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, 
     
नाना म्हणाले, "अर्थातच अशा भाषेचा वापर लोकांनी करायला नको. चित्रपट बनवणाऱ्याला क्रिएटीवीटी दाखवण्याचे स्वातंत्र्य असते. जर मी एखादा चित्रपट बनवेल तर मी नक्की विचार करेन की माझ्या चित्रपटाने कोणालाच त्रास व्हायला नको. पण चित्रपट न पाहताच अगोदरच त्यावर आक्षेप नोंदवणे चुकीचे आहे. याचप्रकारे बाजीराव-मस्तानी वरुनही गदारोळ निर्माण झाला होता. कोणावरच हल्ला करण्याचा कोणालाच अधिकार नाही. मी कोणाला मारण्याचा विचारही करु शकत नाही. जर मी कोणाला नवे जीवन देऊ शकत नाही तर त्याला मारण्याचाही मला अधिकार नाही." 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, नाना पाटेकर यांचे IFFI गोवा येथील फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...