आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nana Patekar Starrer \'Natsamrat\' Collects Rs 10 Crores In 3 Days At Box Office

\'नटसम्राट\'चा पहिल्या तीन दिवसांत 10 कोटींचा गल्ला, \'लय भारी\'चा रेकॉर्ड काढला मोडीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन वर्षाची सुरुवात ही 'लय भारी' ठरली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रिलीज झालेल्या नाना पाटेकर स्टारर 'नटसम्राट' या सिनेमाने रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर दहा कोटींचा गल्ला जमवला आहे. याआधी ‘लय भारी’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 10.5 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली होती.
‘नटसम्राट – असा नट होणे नाही’ हा महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी सिनेमा नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी राज्यभर प्रदर्शित झाला. नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेला हा एकमेव सिनेमा राज्यभरात 400 थिएटर आणि दिवसाला 1600 शोजमधून दाखवला जातो आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह सगळीकडून सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती ‘झी स्टुडिओज’चे संस्थापक नितीन केणी यांनी दिली.
गेल्या पाच वर्षांमध्ये नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात मराठी सिनेमा प्रदर्शित करण्याचा पायंडा ‘झी स्टुडिओज’ने पाडला असून अशापध्दतीने वर्षांच्या पहिल्याच शुक्रवारी प्रदर्शित होणारा ‘नटसम्राट’ हा त्यांचा पाचवा सिनेमा ठरला आहे. नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारलेल्या ‘नटसम्राट’ अप्पासाहेब बेलवलकरांचे सगळीकडून कौतूक होते आहे.
कुसूमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि जबरदस्त संहिता, मर्मभेदी संवाद आणि अभिनयाची जुगलबंदी असलेल्या 'नटसम्राट' या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीत एक अनोखी उंची गाठली. याच नाटकावर आधारीत ‘नटसम्राट’ या सिनेमाच्या माध्यमातून अष्टपैलू कलावंत नाना पाटेकरांनी 70च्या दशकातील गणपतराव बेलवलकर हे पात्र पुनरुज्जीवीत केले. येणा-या दिवसांत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटींची उड्डाणे घेणारे यात शंका नाही.
एक नजर टाकुया यापूर्वी बॉक्स ऑफिसवर कोटीची उड्डाणे घेणा-या काही निवड सिनेमांवर...
सिनेमा एकुण कमाई
लय भारी सुमारे 48 कोटी
टाइमपास 2 सुमारे 40 कोटी
टाइमपास सुमारे 37 कोटी
दुनियादारी सुमारे 32 कोटी
कट्यार काळजात घुसली सुमारे 29.79 कोटी
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय सुमारे 22 कोटी
क्लासमेट्स सुमारे 21 कोटी
डबल सीट सुमारे 20 कोटी
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पुणे आणि मुंबई येथे पार पडलेल्या नटसम्राटच्या स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...