आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झी मराठी पाठोपाठ आता स्टार प्रवाहवर नाटकांची ‘नांदी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('नांदी' नाटकाचे पोस्टर)
मराठी माणसाच्या संस्कृतिक जीवनाचा अविर्भाज्य भाग म्हणजे नाटक. पण प्रत्येकालाच आपली आवड जपण्यासाठी नाट्यगृहांपर्यंत पोहोचता येत नाही आणि आता एन्ड्रॉइडच्या जमान्यात तर नाटकाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आलीय. त्यामुळे काही जुनी-नवी नाटकं प्रेक्षकांपर्यंत आपल्या वाहिनीद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न ‘झी मराठी’ने करायला सुरूवात केली आहेच. आता या कॉम्पिटीशनमध्ये स्टार प्रवाहनेही उडी घेतलीय.
‘स्टार प्रवाह’ या शनिवारी ‘नांदी’ नाटकाचा ‘वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर’ करतंय. कोणतीही गोष्ट चालली की मग ती गोष्ट एन्कॅश करण्याचा प्रयत्न सगळेच चॅनलवाले घेताना दिसतात. एका मालिकेत सासू-सूनेचा ट्रॅक हिट झाला तर दुस-या इतर मालिकांमध्येही तेच दिसते. प्रेमाचा ट्रॅक लोकांना आवडला तर मग प्रेमाचे वारे सर्वच वाहिन्यांच्या मालिकांमध्ये दिसतात. आता बहूधा नाटकांच्याद्वारे ही टिआरपी आणि जीआरपीची गणित सुटतायत का याचा अंदाज चॅनलवाले बांधत असावेत.
'नांदी'मध्ये प्रसाद ओक, हृषिकेश जोशी, अविनाश नारकर, अश्विनी एकबोटे, चिन्मय मांडलेकर, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी अशी मालिका आणि चित्रपटांमध्ये गाजलेली नावं आहेतच. त्यामुळे नाटक, चित्रपट आणि मालिका असा कोणत्याही प्रकार आवडणारा प्रेक्षक आणि या कलाकारांचे चाहते असा मोठा प्रेक्षकवर्ग शनिवारी संध्याकाळी मिळू शकतो, हे बहूधा लक्षात आल्यानेच हा नवा प्रयोग स्टार प्रवाह वाहिनी करत असावी.
कारणं काही का असेना, रसिक प्रेक्षकांसाठी घरबसल्या एकाहून एक सरस नाट्यकृती विकेन्डला अनुभवणं ही एक पर्वणीच म्हणावी लागेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'नांदी' नाटकातील काही निवडक छायाचित्रे...