आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरच्या 'नंदिनी-अंजली’ बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या 'संगीत सम्राट’!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी संगीत क्षेत्रातील अभूतपूर्व टॅलेंट शो, 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात अलीकडेच पार पडला. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान अहमदनगरमधील 'नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड' या दोन सख्ख्या बहिणींना मिळाला. या दोन्ही बहिणींनी सुरुवातीपासून उत्तोमोत्तम सादरीकरण करत दोन्ही परीक्षक आदर्श शिंदे आणि क्रांती रेडकर यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यांच्या पहिल्या सादरीकरणाला आदर्श आणि क्रांती या दोघांनीही उभे राहून कौतुक केले होते. जस जसा कार्यक्रम अंतिम सोहळ्याकडे वाटचाल करू लागला तसतसे 'नंदिनी अंजली' यांचा संगीत सम्राट बनण्याचा दावा बळकट होऊ लागला होता. 
 
महा अंतिम सोहळ्यासाठी सुद्धा त्यांनी जय्यत तयारी केली होती. शात्रीय संगीताचा वारसा लाभलेल्या या बहिणींनी निरनिराळ्या परफॉर्मन्सच्या आधारे आपले सांगीतिक क्षेत्रातील अष्टपैलुत्व दाखवुन दिले. महा अंतिम सोहळ्यात या दोन्ही बहिणींनी सुधीर फडके यांची गाणी, बहारदार आणि तेवढ्याच निरागस पद्धतीने स्वरबद्ध करीत परीक्षकांना आणि प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती दिली. महाअंतिम सोहळ्याला  इतर स्पर्धकांनी सुद्धा चांगले प्रदर्शन केले. मात्र परीक्षकांना शेवटी ८ मधून केवळ ३ स्पर्धक निवडायचे होते. आणि त्यातूनही एक संगीत सम्राट निवडायचा होता. 
 
सर्वांच्याच अतिशय उत्तम सादरीकरणामुळे परीक्षकांनी बरीच चर्चा करून उत्कृष्ट आणि सर्वोकृष्ट स्पर्धकांची निवड केली. निकाल जाहीर करताना परीक्षक सुद्धा एका तणावात होतेच पण स्पर्धक आणि त्यांच्यावर प्रेम करणारा संपूर्ण महाराष्ट्र 'कोण होणार महाराष्ट्राचा पहिला संगीत सम्राट? ' या प्रश्नाच्या उत्तरासाठी आतुर झाला होता. आणि शेवटी ती वेळ आली. क्रांती रेडकर यांनी सर्वप्रथम तिसऱ्या क्रमांकाचे नाव जाहीर केले ते होते जेजुरीचा 'प्रथमेश मोरे'. दुसरे नाव म्हणजेच मुंबईच्या 'दंगल गर्ल्स' यांचे नाव आदर्श शिंदे जाहीर केले आणि शेवटी महाराष्ट्राच्या पहिल्या 'संगीत सम्राट' चे नाव 'विशेष परीक्षक' म्हणून उपस्थित असलेले मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांनी जाहीर केले आणि ते होते ‘नंदिनी अंजली’
 
पुढे वाचा, ‘नंदिनी अंजली’विषयी काय म्हणाले क्रांती रेडकर आणि आदर्श शिंदे... 
बातम्या आणखी आहेत...