आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Award Winner Actress Usha Jadhav Made Eco Friendly Ganpati

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Glamours उषा जाधवची बाप्पा भक्ती, म्हणाली बाप्पामूळेच मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उषा जाधवने बनवला इको-फ्रेंडली गणपती
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने पाणी दूषित होतेच. पण माश्यांच्याही आरोग्यावर त्यामूळे त्रास होतो. निसर्गाचा हा –हास थांबवण्यासाठी खारीचा वाटा प्रत्येकाने उचलणे आवश्यक आहे. आणि त्यामूळेच शाडू मातीच्या गणेशमूर्ती गणेशभक्तांनी आणाव्यात, ह्यासाठी divyamarathi.comने मोहिम सुरू केली. आणि त्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवसूध्दा सहभागी झाली.
अभिनेत्री उषा जाधवने आयुष्यात पहिल्यांदा दिव्य मराठीमूळे शाडू माती कशी असते, ते पाहिली. आणि शाडूमातीचा छोटासा गणपतीही बनवला. स्वत:च्या हाताने गणपती बनवताना ती एकदम हरखून गेली होती.
इको-फ्रेंडली गणपती बनवण्याच्या ह्या अनुभवाबद्दल उषा म्हणते, “शाडू मातीचा गणपती कसा असतो, हे ही मला माहित नव्हतं. Divyamarathi.comमूळे ते कळलं. गणपती कसा असतो, आणि कसा करायचा ते मी पहिल्यांदा पाहिलं. आणि मग स्वत: करून पाहिला. खूप वेगळा अनुभव होता. अविस्मरणीय अनुभव तर होताच, पण त्यासोबतच आपल्या हाताने बाप्पाचे मूर्त रूप आकाराला येतेय, हे पाहणं आणि ते साकारणं खूप आनंददायी असतं. आजपर्यंत कधी विचारही केला नव्हता, की मी माझ्या हाताने एक सुंदर मूर्ती बनवू शकते. अर्थातच हे घडलं फक्त दिव्य मराठीमूळे.”
गणपतीभक्त उषा पूढे म्हणते, “गणपतीबाप्पा हे माझं आराध्य दैवत. गणपती बाप्पा लहानपणापासून मला प्रिय आहे. पहिली गाडी घेतली तेव्हा सर्वात अगोदर बाप्पाच्या मूर्तीला गाडीत आणून बसवलं. घर बदललं तर पहिली मूर्ती गणपतीचीच असायची. शुटिंग सुरू करतानाही पहिल्यांदा बाप्पाचीच पूजा करून सुरूवात होते. पहिल्यापासूनच गणपती बाप्पाशी एक खास ऋणानुबंध आहे. त्यामुळे असं वाटतंय की मी divyamarathi.comच्या इको-फ्रेंडली गणपती घरी आणण्याच्या मोहिमेत सहभागी होणं, हे सूध्दा त्या विधात्यानेच माझ्याकडून करवून घेतलं. त्याच्याच प्रेरणेने आज त्याची मूर्तीही मी बनवू शकले.”
पूढील स्लाइडमध्ये वाचा, उषा जाधवची कोणती मनोकामना बाप्पाने केली पूर्ण