आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Award Winning Film ‘Fandry’ On Google Play, ITunes And Facebook

आता \'फँड्री\' दिसणार गूगल प्ले, आय-ट्यूनस् आणि फेसबुकवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा फँड्री आता आय-ट्यूनस्, गूगल प्ले आणि फेसबुकवर पाहायला मिळणार आहे. निर्माते विवेक कजरिया आणि निलेश नवलखा हे पुन्हा एक नवीन वाटचाल करत आहेत. मराठी सिनेमांना जागतिक स्तरावर घेऊन जात असतानाच त्यांनी सिख्या एंटरटेन्मेंट आणि सिनेकॅरॅवान या उपक्रमाशी सोबत करून फँड्री सिनेमा डिजिटल माध्यमातून 110 देशांमध्ये प्रदर्शित करत आहेत.
सिनेमाच्या माध्यमातील हा नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला आहे. यात सिनेकॅरॅवान यांनी वितरकांची आणि मार्केंटींगची भूमिका बजावली आहे. कारण हा उद्योग स्वतंत्र सिनेमांचे जागतिक स्तरावर डिजिटल प्रदर्शन आयोजित करीत असून गुगल प्ले, आय-ट्यूनस्, अमॅझॉन, फेसबुक, बीएसकेवायबी, नेटफ्लिक्स, हुलू, क्रॅकल आणि इतर माध्यमांतून सिनेमा यशस्वीरित्या रिलीज केला जात आहे.
सिनेकॅरॅवानचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकिय संचालक अपूर्व बक्षी याविषयी सांगतात, की सिनेमा वितरणातील त्रास कमी करून योग्य उठाव देणे ही आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. एकाचवेळी सर्वाधिक विभागांमध्ये आणि माध्यमांमधून सिनेमा वितरीत आणि प्रदर्शित करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
फँड्री हा अत्यंत शक्तिशाली सिनेमा असून ते जगभरात जायलाच हवा. आम्हाला हा प्रवास निलेश आणि विवेक यांच्यासोबत करण्यात खूप आनंद आहे.
सिनेकॅरॅवानच्या व्यवस्थापकिय संचालक पूजा कोहली म्हणतात, की विवेक आणि निलेश सारख्या निर्मात्यांना वितरणाच्या खिडक्या बंद होताना दिसत आहेत आणि भारतात 4जीचे आगमन होत असल्याने इंटनटेवरही कार्यक्रमांची मागणी प्रचंड वाढणार आहे. याची त्यांना जाणीव आहे. डिजिटल आणि मोबाईल प्लॅटफॉर्म हे प्रेक्षकांपर्यंत पोहण्यासाठी सर्वाधित कार्यक्षम ठरणार आहे.