आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Award Winning Khwada Actor Prashant Ingle Try To Attempt Suicide

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या \'ख्वाडा\' सिनेमातील अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
\'ख्वाडा\' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमात \'पांडा\'ची भूमिका साकारलेल्या 34 वर्षीय अभिनेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. या अभिनेत्याचे नाव प्रशांत इंगळे अअसून त्यांनी \'ख्वाडा\' सिनेमात पांडाची भूमिका साकारली होती. ते  कर्जबाजारीपणामुळे त्रस्त होते.
त्यांनी किटकनाशकाचे औधष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचलेत. ससूनमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती इंगळे यांच्या नातेवाईकांनी दिली.
 
प्रशांत इंगळे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात राहतो. प्रशांत यांनी घर बांधण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतले होते. मात्र यावर्षी दुष्काळची परिस्थिती निर्माण झाल्याने ते कर्ज फेडू शकले नाहीत. काही दिवसांपासून ते कर्जामुळे तणावात होते आणि त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज आहे. प्रशांत यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.   
 
प्रशांत यांना \'ख्वाडा\' सिनेमासाठी केवळ 15 हजार रुपये मानधन मिळाले होते.