Home »Bollywood »Marathi Cinekatta» Natya Samelanadhyaksh Jayant Savarkar News In Marathi

नाट्य संमेलनाध्यक्ष स्वत: करणार रंगदेवतेची सेवा, 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात आचार्यांची भूमिका

विशेष प्रतिनिधी | Apr 21, 2017, 13:02 PM IST

सुलभा देशपांडे नाट्यनगरी-उस्मानाबादेतील नाट्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर तुळजाभवानी मैदानावरील राजाराम शिंदे रंगमंचावर 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर हे स्वतः नाटकामध्ये भूमिका साकारणार आहेत. नाटकातील आचार्यांच्या भूमिकेत जयंत सावरकर असणार आहेत. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांना अशा प्रकारे नाट्यसंमेलनाच्या मंचावर नाटकाचा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ आहे असे म्हटले जात आहे.

सायंकाळी ६ वाजता नाट्यसंमेलनाचे उद्घाटन राजाराम शिंदे रंगमंचावर होत आहे. उद्घाटनानंतर तुझे आहे तुजपाशी या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाशी संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांचा जुना संबंध आहे. तरुणपणी सावरकर हे या नाटकातील शाम ची भूमिका करायचे. जवळपास ८०० प्रयोगांमध्ये त्यांनी शामची भूमिका केली. पण पुढे वयोमानानुसार त्यांनी याऐवजी नाटकात आचार्यांची भूमिक करण्यास सुरुवात केली.

समारोपाला मोहन जोशींचा प्रयोग
नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला ज्याप्रमाणे नाट्य संमेलनाध्यक्षांचा प्रयोग होणार आहे, त्याचप्रमाणे समारोपाला नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या माझी आई तिचा बाप या नाटकाचा प्रयोग होत आहे. रविवारी रात्री ८.३० वाजता राजाराम शिंदे रंगमंचावर होणाऱ्या या नाटकाच्या प्रयोगाने संमेलनाचा समारोप होईल.

‘तुझे आहे तुजपाशी' या नाटकाशी आंतरिक नाते.... वाचा पुढील स्लाइड वर...

Next Article

Recommended