आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Cannes मध्ये मराठी दिग्दर्शकाला मिळाली वाहवाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः दिग्दर्शक निरज घायवान)
नुकत्याच संपन्न झालेल्या 68 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी दिग्दर्शक निरज घायवानच्या पहिल्या फिल्मचा दोन पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय. 'मसान' हा चित्रपट खरं तर निरजचा दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट. पण ह्या चित्रपटाने कान्स भरारी घेतली आणि कान्समध्ये चित्रपटाला एक नाही तर दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
अत्यंत मानाच्या समजल्या जाणा-या कान्समध्ये नीरजला अनसर्टन रिगार्ड या विभागात 'आश्वासक दिग्दर्शक' पुरस्काराने गौरवण्यात आलंय. एवढंच नाही तर अनसर्टन रिगार्ड विभागातल्या ज्युरींनी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा ही सन्मान दिलाय. त्यामुळे अर्थातच फिल्मच्या कलाकारांनी पॅरिसमध्ये जंगी सेलिब्रेशन केलंय. 'मसान'मध्ये अभिनेत्री ऋचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहे.
निरज घायवान हा खरं तर मराठी मुलगा. पण तो लहानाचा मोठा झाला हैदराबादमध्ये. आज हैदराबादकर असला तरीही कान्समध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकवणारा तो पहिला मराठी आणि भारतीय दिग्दर्शक असल्याने त्याचा मराठीजनांना अभिमान वाटणं स्वाभाविक आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कान्समधील दिग्दर्शक निरज घायवान यांची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडवर 'मसान' चित्रपटाचा प्रोमो...