आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोमधील या मराठी अभिनेत्रीला ओळखले का तुम्ही, अभिनय बेर्डेची आहे खास मैत्रीण !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  आज बालदिनानिमित्त सर्वचजण त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करत आहे. त्यात एका खास अभिनेत्रीनेही तिचा फोटो शेअर केला आहे. अजूनही चांदरात आहे आणि मन उधाण वाऱ्याचे या मालिकांमधून ही अभिनेत्री झळकली होती पण केवळ 2 मालिका केल्यानंतर ती टीव्हीच्या पडद्यावरुन गायब झाली होती. 
 
ही अभिनेत्री आहे नेहा गद्रे. मराठमोळे सौंदर्य आणि लोभस चेहरा या दोन गोष्टींच्या बळावर नेहाने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहच्या खास लाजऱ्या शैलीला अनेक तरुण भुरळले होते. नेहाने अजूनही चांदरात आहे मालिकेत रेवा आणि मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत गौरीची भूमिका केली होती जी अल्पावधीत लोकप्रिय झाली. नेहा त्यानंतर कोणत्याही मालिकेत झळकली नाही. 
 
तसे पाहिले तर नेहाची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात ताजीच आहे. चित्रपट, मालिकेत नसली तरी नेहा सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे. नेहा तिचे सर्वच फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहा गद्रेचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...