आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मी गुलाबी नोट दोन हजाराची...’ म्हणत मानसीने लावले ठुमके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः काही महिन्यांपूर्वीच चलनात आलेल्या दोन हजाराच्या नोटेने चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. मराठी सिनेसृष्टीतही दोन हजाराची गुलाबी नोट प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज झाली आहे. ‘प्रेमा’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची’ या आयटम साँगचे चित्रीकरण अलीकडेच पूर्ण झाले. अभिनेत्री मानसी नाईक हिच्या मोहक अदा सिनेरसिकांना पहायला मिळणार आहेत.
 
मार्कंडेय फिल्म प्रस्तुत, रमेश गुर्रम निर्मित आणि सदानंद इप्पकायल दिग्दर्शित ‘प्रेमा’ या आगामी चित्रपटातील गाणी शेखर आनंदे यांनी लिहीली असून त्यांनीच ती संगीतबद्ध केली आहेत. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि रेश्मा सोनावणे यांनी गाणी गायली असून नृत्यदिग्दर्शन सिद्धेश पै यांनी केले आहे. नयन निरवळ, शिल्पा ठाकरे, सचिन बत्तुल या कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.
 
चलनातील दोन हजाराची नोट लोकांनी जशी स्वीकारली तशीच चंदेरी पडद्यावरची ही दोन हजाराची गुलाबी नोट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला. 

पुढील स्लाईड्सवर बघा, ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची...’ या आयटम साँगमधील मानसीची दिलखेचक अदा दाखवणारी छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...