आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘Thank U विठ्ठला’चे पोस्टर लाँच, मुख्य भूमिकेत महेश मांजरेकर-मकरंद अनासपुरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विषयांचे वैविध्य असलेल्या मराठी चित्रपटांची निर्मिती सातत्याने होऊ लागली आहे. ‘Thank U विठ्ठला’ या हटके शीर्षकाचा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. एम.जी.के प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांची असून कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांच आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. येत्या 3 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा पहाता येईल.
 
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद साफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.
 
चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. संगीत रोहन – रोहन तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.
बातम्या आणखी आहेत...