आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवीच्या आईचे नवे नाटक, आता दिसणार ‘ग्रेसफुल’ भूमिकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री आशा शेलार
गेल्या दोन वर्षात अभिनेत्री आशा शेलार ह्यांची ओळख ‘होणार सून मी ह्या घरची’मूळे जान्हवीची आई अशी झाली आहे. पण आशा शेलार ह्यांनी आपल्या डेली सोपमधनं थोडावेळ काढून रंगभूमीसाठीही थोडा वेळ देण्याचा निर्णय घेतलाय. रंगभूमीवर १५ ऑगस्टपासून आलेल्या ‘ग्रेसफुल’ ह्या नव्या नाटकात आशा शेलार ह्यांची जुगलबंदी अभिनेत्री आदिती सारंगधरसोबत रंगणार आहे.
मोहन घाटपांडे लिखीत आणि राजन ताम्हणे दिग्दर्शित ह्या नाटकाची निर्मिती आशय प्रॉडक्शनच्या अनुराधा वाघ ह्यांनी केली आहे. नाटकात दोनच पात्र आहेत. एका लेखक-दिग्दर्शकाची पत्नी आणि त्याची प्रियसी. पत्नीच्या भूमिकेत आशा शेलार तर प्रियसीच्या भूमिकेत आदिती सारंगधर दिसणार आहे.
रंगभूमीवर ह्याअगोदर आदिती सारंगधरचे प्रपोजल नाटक आले होते. आता ‘ग्रेसफुल’ नाटकातून दिसणारी आदिती सांगते,” प्रपोजलमध्ये मला खूप बोलायला लागायचं. पण ह्या नाटकाचे वैशिष्ठ्य आहे की, ह्यात कमी बोलून खूप काही सांगायचंय. मी ह्या नाटकात वेदा रत्नपारखीच्या भूमिकेत आहे.”
मोहन घाटपांडे नेहमीच प्रायोगिक रंगभूमीशी निगडीत होते. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे हे पहिले नाटक असणार आहे. ते म्हणतात, “दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या, वेगळ्या वयोगटातल्या आणि शैक्षणिक पात्रता असलेल्या बायका एकत्र येतात. तेव्हा काय? हे नाटकात समोर येतं जाईल. आपला नवरा परदेशी गेल्यावर त्याला विमानतळावर सोडून ह्या दिग्दर्शकाची पत्नी त्याच्या प्रियसीला आपल्या घरी घेऊन येते. त्यानंतर त्यांच्यात पूर्ण नाटकभर जो संवाद होतो. त्यातून ह्या दोघीच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्या दोघींच्या समोर येतात. अनेक धक्के एकमेकींना देत, नाटक प्रेक्षकांच्या समोर उलगडत जातं.”
दिग्दर्शक राजन ताम्हणे म्हणतात, “मोहनने हे नाटक मला वाचून दाखवल्यावर मला ते एवढं आवडलं की, मी खिशातला एक रूपया त्याला काढून दिला. आणि त्याला सांगितलं, की हे मीच करणार. ही सध्या तुझी साइनिंग अमाउंट घे. पैसेनंतर देतो. पण स्क्रिप्ट कुणाला देऊ नकोस. आणि त्यानंतर रंगभूमीवर आणताना आशा आणि आदिती ह्या दोघींचंच नाव समोर आलं.”
अभिनेत्री आशा शेलार म्हणतात,“गेल्या सहा-सात महिन्यांपासून मनांत होतं, की, काहीतरी नवीन नाटक मला करायचंय. मी नेहमीच रंगभूमीशी निगडीत होते. त्यामूळे मालिका करत असताना पून्हा रंगभूमीची आठवण येऊ लागली होती. आणि मग राजनदादा ही सुवर्णसंधी घेऊन आले. त्यात मला माझ्या वयाची भूमिका करायला मिळतेय. त्यामूळे व्यक्तिरेखा खुलवायलाही मजा येतेय. आणि नाटक दोनच व्यक्तिरेखांमध्ये घडतंय. त्यामूळे अभिनयासाठी खूप वाव आहे.”
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाडमध्ये पाहा, 'ग्रेसफुल' नाटकातले आदिती सारंगधर आणि आशा शेलार ह्यांचे फोटो