आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दगडू’ चालला ‘सूसाट’, पाहा, प्रियदर्शन जाधवचं नवं नाटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘टाइमपास-2’चा दगडू म्हणजेच लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव सध्या ‘सूसाट’ हे नाटक करत आहे. १५ ऑगस्ट पासून ह्या नाटकाच्या नावाप्रमाणेच नाटकाचे रंगभूमीवर ‘सूसाट’ प्रयोग करण्याचा निर्माता अभिजीत साटम ह्याचा मानस असणार आहे. अभिजीत साटम आणि प्रियदर्शन जाधव ह्याअगोदर ‘मिस्टर एन्ड मिसेस’ नाटकासाठी एकत्र आले होते. अभिजीतने ‘मिस्टर एन्ड मिसेस’ची निर्मिती केलीय. तर प्रियदर्शने त्याचे लेखन-दिग्दर्शन केले आहे.
पून्हा एकदा नव्या नाटकासाठी एकत्र आल्याबद्ल प्रियदर्शन सांगतो, “ ‘मिस्टर एन्ड मिसेस’ मी लिहीले होते, त्यामुळे ते दिग्दर्शन करताना नक्की काय करायला हवे. ह्याविषयी मला माहित होते. पण जेव्हा ‘सूसाट’चं मी दिग्दर्शन केलंय. तेव्हा अजित देशमुखने लिहीलेली संहिता मला दिग्दर्शित करायची होती. ह्या नाटकात प्रत्येक व्यक्तिरेखेचे बारकावे समजून घ्यायचे होते. त्याचप्रमाणे ह्यात मी अभिनयही करतोय. त्यामुळे तसं म्हणायला गेलं. एकावेळी दोन गोष्टींची मोठी जबाबदारी आहे. आणि अभिजीत साटमचं म्हणशील तर ‘मिस्टर एन्ड मिसेस’च्यावेळी पहिला निर्माता अचानक नाटक सोडून गेल्याने अभिजीतने त्याच्या निर्मितीची जबाबदारी घेतली होती. ह्या नाटकाचा निर्माता पहिल्यापासून अभिजीतच आहे.”
प्रियदर्शन नाटकाच्या कथानकाविषयी सांगतो “ मुंबईला सगळं चांगलंच होतं, आणि आपल्या शहरात सगळं वाईट अशी समजूत करून घेऊन नाटकाचा नायक मुंबईला जायला निघतो. नायकाच्या घरातला एकही माणूस कधी मुंबईला गेलेला नसतो. ह्या नायकाने मुंबई कधी पाहिलेली नसते. नायक आपल्या आयुष्याबद्दल नकारात्मक असतो. तर त्याविरूध्द त्याची बायको आयुष्याबाबतीत खूप सकारात्मक असते. मुंबईला निघालेल्या ह्या नवरा-बायकोचा प्रवास, त्यांना प्रवासात मिळालेली माणसं, आपल्याला नाटकात दिसतात. एक टिसी, सहप्रवासी ह्यातून नाटक फुलतं जातं. मी नाटकात तो नायक असणार आहे. तर माझ्या बायकोच्या भूमिकेत अभिनेत्री गौरी सुखटणकर असणार आहे. ह्याशिवाय पुर्णिमा अहिरे, सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत आहेत.”
संपूर्ण नाटक हे रेल्वे स्टेशनवर घडतं. त्यामूळे रंगमंचावर आपल्याला रेल्वे स्टेशनचं नेपथ्य दिसतं. तसंच ह्या नाटकात एक रेल्वे ट्रेनचा डबाही दिसतो. सूसाट पहिल्या अंकात विनोदी असलं तरीही दूस-या अंकात आपल्या आयुष्याविषयी बराच विचार करायला लावणारं नाटक आहे.
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रियंदर्शनच्या 'सुसाट' नाटकाची रंगीत तालीम