आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोमँटिक कॉमेडी मालिका ‘आम्ही दोघे राजाराणी’, राजा-राणीच्या संसारात कुटुंबीय लावणार तडका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन विविध व्यक्तीरेखेची माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा सॉलिड फ्रिक्शन तयार होते, या दोघांची लव्हस्टोरी देखील धम्माल असते. स्टार प्रवाहवर 'आम्ही दोघे राजा राणी' या मालिकेतून अशीच एका गोड जोडीची लोभस प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
पार्थ आणि मधुरा हे दोघे 'राजा राणी' या मालिकेत असून हे दोघेही आपापल्या अतरंगी कुटुंबासोबत राहतात. एकत्र कुटुंबात वाढणाऱ्या या दोघांचे त्यांच्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे पण त्यांचे नमुनेदार कुटुंबीय या दोघांच्या प्रेमकहाणीत जबरदस्त तडका देणार आहेत. दोघांच्या राजाराणीच्या संसारात त्यांची कुटुंब काय करामती करतायत हे अतिशय मनोरंजक आणि तितक्याच खुमासदारपणे मांडण्यात आलं आहे. या दोघांची हटके भेट, त्या भेटीचे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात कसे रुपांतर होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रेमाची गुलाबी छटा असलेली ही रोमँटिक कॉमेडी मालिका संपूर्ण कुटुंबासह पहावी अशी आहे.
संगीता राकेश सारंग यांच्या 'कॅम्सक्लब'ने या मालिकेची निर्मिती केली आहे. विजय पटवर्धन, समीर चौघुले आणि अभिजित पेंढारकर मालिकेचं लेखन करत असून, संचित वर्तक दिग्दर्शन करत आहेत. मंदार कुलकर्णी, दीप्ती लेले या देखण्या गोंडस जोडी सोबत मिलिंद फाटक, विनय येडेकर, मैथिली वारंग, सुलेखा तळवलकर, शीतल शुक्ल हे विनोदी अभिनायात मुरब्बी कलाकार यातील भूमिका साकारत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, दिप्ती लेले आणि मंदार कुलकर्णी यांच्या फोटोशूटची खास झलक....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...